बल्लारपूर :- महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर च्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे इटोली या गावात 16 ते 22 फरवरी 2025 दरम्यान एनएसएस चे शिबीर पार पडत असतांना 19 फरवरी ला रयतचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात " सर्पज्ञान व अंधश्रद्धा " विषयावर आयु. देविदास करमरकर सामाजिक कार्यकर्ता बल्लारपूर यांचे मार्गदर्शन पर प्रबोधन पार पडले याप्रसंगी विचारमंचावर मा. देविदास करमरकर, एड. संदेश हस्ते, नोटरी (भारत सरकार), पवन भगत, साहित्यिक बल्लारपूर, महेंद्र भडके, तुलसीदास पिपरे सरपंच इटोली, डॉ. पल्लवी जुनघरे, एनएसएस कार्यक्रम अधिकारी, डॉ. विनय कवाडे, सहकार्यक्रम अधिकारी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमाना वंदन करून झाली " सर्पज्ञान व अंधश्रद्धा " विषयावर आयु. देविदास करमरकर सामाजिक कार्यकर्ता बल्लारपूर यांचे मार्गदर्शन पर प्रबोधन पर मार्गदर्शन करतांना त्यांनी पर्यावरणच्या दृष्टीने सापाचे महत्व तसेच सर्प विषयी समाजात असलेलं अज्ञान तसेच विषारी, निमविषारी व बिनविषारी सापाविषयी सखोल असे मार्गदर्शन केले तसेच साप हा शेतकऱ्यांचा मित्र असून सापाचे महत्व विषद केले. त्यानंतर एड. संदेश हस्ते यांनी कायदेविषयक मार्गदर्शन करतांना " महिलांची सुरक्षा, हुंडा प्रतिबंधक कायदा स्त्री विषयक कायदे सोबतच वन्य प्राण्या बरोबर साप यांना पकडणे न त्यांना मारणे हे कायद्याच्या कक्षेत येते व त्यावर कोणती शिक्षा होऊ शकते यावर मार्गदर्शन केले. पवन भगत यांनी मार्गदर्शन करतांना एनएसएस मूळ विद्यार्थ्यांना मिळणारी शिस्त तसेच स्वतःविषयी विचार न करता दुसऱ्या प्रति कार्य करण्याची तत्परता ही शिबिरात शिकायला मिळते तसेच " कोरोनाच्या संक्रमन काळातील ' ते पन्नास दिवस ' या कादंबरीचा महाराष्ट्रातील 2 विद्यापीठात समावेश केल्याची त्यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाचे संचालन मृणाली नळे तर आभार प्रदर्शन प्राची कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. दिपक भगत, प्रा. कृष्णा लाभे, प्रा. विभावरी नखाते यांची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या