बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालित बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या एनएसएस राष्ट्रीय सेवा योजना विभागा द्वारे 16 फरवरी ते 22 फरवरी दरम्यान 7 दिवसीय निवासी शिबीराचे आयोजन इटोली या गावात करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उदघाट्न 17 फरवरी ला पार पडले असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. तुलसीदास पिपरे सरपंच इटोली, मा.नरेश बुरांडे उपसरपंच इटोली मा. सौं पुष्पलता देरकर मुख्याध्यापक जि. प. विद्यालय इटोली तसेच ग्रामपंचायत इटोली चे सर्व सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल यांची विचार मंचावर उपस्थिती होती.
या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासा बरोबर बौद्धीक व सामाजिक विकास घडविण्याला महत्व दिले जाणार असून विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना कला सादर करण्याला संधी असणार आहे यासोबतच ग्रामस्वच्छता, श्रमसंस्कार शिबीर, अंधश्रद्धा निर्मूलन सोबतच विविध विषयावर तज्ञ चे मार्गदर्शन होणार असल्याचे विचार यावेळी मान्यवर अतिथीनी व्यक्त केले. या उदघाटनीय कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्रद्धा कवाडे, यांनी केले यावेळी एनएसएस (राष्ट्रीय सेवा योजना) कार्यक्रम अधिकारी डॉ. पल्लवी जुनघरे, सह कार्यक्रम अधिकारी डॉ. विनय कवाडे, डॉ. पंकज कावरे, प्रा. मोहनीश माकोडे ई ची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या