महात्मा फुले महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन, कवी कुसुमाग्रजांची जयंती उत्साहात साजऱी (Mahatma Phule College celebrated Marathi language honor day, poet Kusumagraja's birth anniversary with enthusiasm)

Vidyanshnewslive
By -
0
महात्मा फुले महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन, कवी कुसुमाग्रजांची जयंती उत्साहात साजऱी (Mahatma Phule College celebrated Marathi language honor day, poet Kusumagraja's birth anniversary with enthusiasm)


बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या माध्यमातून " मराठी भाषा गौरव दिन " अर्थात कवी कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मराठी विभाग प्रमुख प्रा. सतिश कर्नासे, डॉ. बादलशाह चव्हाण यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा फुले व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमाना पुष्प अर्पण करून व दीप प्रज्वलन करून झाली यावेळी विचार मंचावर प्रा. सतिश कर्नासे, डॉ. बादलशाह चव्हाण, डॉ. किशोर चौरे, प्रा. पंकज नंदुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. चव्हाण सर म्हणालेत की, " महाराष्ट्रात 27 फरवरी कवी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून राज्यभर साजरा केला जातो केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे तसेच कुसुमाग्रजांची साहित्य संपदा मौलिक व प्रभावशाली असून कुसुमाग्रजानी मराठी भाषेचे अर्थात माय मराठीचे श्रेष्ठत्व वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला " या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाला डॉ. विनय कवाडे, डॉ. पल्लवी जुनघरे, डॉ. रोशन फुलकर, प्रा. शुभांगी भेंडे(शर्मा), प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. दिपक भगत, प्रा. श्रद्धा कवाडे, प्रा. विभावरी नखाते, यांच्या सह महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)