वृत्तसेवा :- तेलंगणा निर्मित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर व कार्यावर आधारित महानाट्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धम् शरणम् गच्छामि या महानाट्याचा प्रयोग चंद्रपुरात.. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार येणाऱ्या तीन मार्च 2025 रोजी चंद्रपूर मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित महानाट्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धम् शरणम् गच्छामि या महानाट्याचा प्रयोग चंद्रपूर येथे 3 मार्च 2025 रोजी चंद्रपूर मध्ये होत आहे. अभ्युदय आर्ट अकॅडमी नलगोंडा तेलंगणा द्वारा प्रस्तुत या महानाट्याचा प्रयोग 101 वा प्रयोग चंद्रपूर मध्ये होत आहे संविधानाच्या 75 व्या अमृत महोत्सवनिमित्त संविधान निर्मितीची त्याग व संघर्षाची गाथा या महानाट्यातून आपणास पहावयास मिळेल. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून तर महापरिनिर्वानापर्यंत बुद्ध धम्माची दीक्षा व अनेक जीवनातील संघर्षमय गाथा या महानाट्यातून उद्रुक झालेले आहेत. चंद्रपूर मध्ये होत असलेल्या या महानाट्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय किर्तीचे ख्यातनाम बुद्धिस्ट *गोल्डमॅन डॉ रोहित पिसाळ* यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह चंद्रपूर येथे हे महानाट्य होणार आहे असे मयूर साखरे ,प्रीतम शेंडे, सौ रुपाली वानखेडे, राज कांबळे तोडे, मृणालिनी नगराळे, दीक्षा थूल साव, सौ अल्का मोटघरे मॅडम, पराग कांबळे इत्यादींनी सुचविले. याच आयोजन प्राध्यापक दुषंत नगराळे, अमित वाघमारे, विनोद देशपांडे, विनयबोधी डोंगरे पराग कांबळे, पियुष गेडाम, प्रणय गेडाम, धीरज शेंडे, हंसू अलोने, मयूर साखरे, प्रीतम शेंडे व राज कांबळे यांनी केले आहे सोमवार दिनांक 3 मार्च 2025 ला सायंकाळी सहा वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह चंद्रपूर येथे हे महानाट्य होणार आहे तरी या महानाट्याला समाजातील व आंबेडकरी प्रेमी चाहते संविधान प्रेमी लोकांनी अवश्य हे महानाट्य आवर्जून पहावे. जय भीम जय संविधान
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या