बल्लारपूर -: भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ आम आदमी पक्षातर्फे मागील चार वर्षांपासून *"एकतेची मशाल महोत्सव"* साजरा करण्यात येत आहे. हे आयोजन दरवर्षी 26 नोव्हेंबर संविधान दिनी साजरा करण्यात येतो परंतु 2024 च्या नोव्हेंबर महिन्यात निवडणुकीची रणधुमाळी असल्याने हा महोत्सव 26 नोव्हेंबर ला न घेता 26 जानेवारीला घेण्यात येत आहे. या महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या व डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून "मशाल यात्रा" काढून सर्व धर्मगुरूंच्या हाथाने एकतेची मशाल पेटवून कार्यक्रमाची शुभारंभ करण्यात येणार आहे. व दर वर्षी या कार्यक्रमात बल्लारपूर शहरातील 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय संविधानाचे कलम हस्तलेखन स्पर्धा देखील आयोजित करण्यात येते आणि स्पर्धेत आलेल्या आर्टिकलचे कार्यक्रम स्थळी प्रदर्शनी लावण्यात येते. व सामाजिक एकता आणि एकात्मता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने कव्वाली व कीर्तन सारखे अनेक कार्यक्रम घेण्यात येतात. यंदाच्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त साजरे होणारे "एकतेची मशाल महोत्सव- वर्ष ४थे" या कार्यक्रमात स्टार प्रवाह छोटे उस्ताद -03 फेम गायिका "अंजली गलपाळे" (वय ११) हि देशभक्ती गीत, छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्यगाथा व भीम गीतांचे गायनाचे सादरीकरण करणार आहे . तरी शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी सर्व बल्लारपूर शहरातील जनतेला आवाहन केले आहे की एकतेची मशाल महोत्सवात येऊन जनतेने एकतेची मशाल पेटवून सर्व धर्म समभावाचे संदेश अजरामर करावे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या