अयोध्येतील राममंदिर, देशाच्या संसद भवनातील दारासाठी वापरण्यात आलेल बल्लारपूरचे सागवान लाकूड आता प्रधानमंत्री कार्यालयातही खुर्चीच्या स्वरूपात शान वाढविणार (Teak wood from Ballarpur, which was used for the Ram Mandir in Ayodhya, the doors of the country's Parliament House, will now also grace the Prime Minister's Office in the form of a chair.)

Vidyanshnewslive
By -
0
अयोध्येतील राममंदिर, देशाच्या संसद भवनातील दारासाठी वापरण्यात आलेल बल्लारपूरचे सागवान लाकूड आता प्रधानमंत्री कार्यालयातही खुर्चीच्या स्वरूपात शान वाढविणार (Teak wood from Ballarpur, which was used for the Ram Mandir in Ayodhya, the doors of the country's Parliament House, will now also grace the Prime Minister's Office in the form of a chair.)


चंद्रपूर :- देशाच्या पंतप्रधानांच्या खुर्चीसह पंतप्रधान कार्यालयातील कामासाठी चंद्रपूरमधील सागवान लाकूड वापरण्यात येणार आहे. या कामासाठी तब्बल ३ हजार घन फूट सागवान चंद्रपुरातून दिल्लीला रवाना होणार आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. येत्या ८ सप्टेंबरपासून सागवान दिल्लीला पाठवण्यास सुरुवात होणार आहे. राममंदिर आणि संसदेमधील कामासाठी महाराष्ट्रातून लाकूड पुरवण्यात आले होते. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असून देशाच्या पंतप्रधानांची खुर्चीही चंद्रपूरमधील सागवानाच्या लाकडांपासून बनणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे अयोध्येमधील प्रभू श्रीराम मंदिर, दिल्लीमधील नवी संसद भवनाच्या निर्मितीमध्ये महाराष्ट्राने मोलाचा वाटा उचलला होता. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात मोठ्या प्रमाणावर सागवानाचे जंगल आहे. तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आढळणारे गोलाकार लाकूड आणि चिरण सागवान मजबूत आणि सर्वोत्तम लाकूड मानले जाते. त्याशिवाय ते प्रदीर्घ काळ टिकते. त्यामुळे त्याला देशभरातून मोठी मागणी आहे. याआधी राममंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासह इतर कामे याच लाकडाने केली होती. राम मंदिराच्या निर्मितीवेळी १८०० क्युबीक मीटर लाकूड अयोध्येला नेण्यात आले होते. तसेच नव्या संसद भवनाच्या निर्मितीवेळीही या लाकडाचा वापर करण्यात आला होता. पंतप्रधानांच्या खुर्चीसह पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय मंत्रीमंडळ सभागृह, केंद्रीय मुख्य सचिवांचे दालन तयार करण्यासाठी हे सागवान वापरण्यात येणार आहे. देशात सर्वोत्तम सागवान चंद्रपुरात असल्याने येथील लाकडापासून दिल्ली कार्यालय तयार करण्याचा निर्णय केंद्रीय समितीने घेतला आहे. त्यामुळे राम मंदिर, संसद भवन नंतर पंतप्रधानांच्या खुर्चीच्या रुपात महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)