(वार्तापत्र) :- गत २ ते ३ वर्षाआधी बनावट देशी मदिरेचा कारखाना तालुक्यातील ए.वी. जे. गोट फार्म चितेगाव येथे जिल्हा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पकडला. त्याआधी संपूर्ण तालुक्यात या बनावट देशी दारूची मोठी चचॉ राहीली होती.स्थानीक पोलिसांनी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या बनावट देशी दारू कारखान्याकडे कानाडोळा का केला होता यावरही संवाद झडले होते. सदर धंदा ऐन हाईवे वर अनेक महिन्यांपासून सुरू असताना सुद्धा बिट जमादार, डि.बी.पथक किंवा एकंदरीत पोलिसांच्या लक्षात आला नव्हता हे विशेष . त्यानंतर आता चक्क "डुप्लीकेट" विदेशी दारूचा बनावट गोरखधंदा (कारखाना) मुल तालुक्यातील कुठल्यातरी सूनसान इमारती मध्ये सुरू असल्याची मोठी चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू असल्याने विदेशी मद्य शौकीनांची आरोग्याला धरून मोठी चिंता वाढलेली दिसून येत आहे. डूप्लीकेट विदेशी मदिरेमध्ये मुख्यत्वे सर्वसामान्यांच्या पसंदीची आणि साधारण माणसाला परवडणारी विदेशी मदिरा आर. एस. व आई. बी. यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.या दोन्ही प्रकारच्या मदिरा निप व ९० एम. एल. मध्ये पॅकिंग करून गाव खेड्यात व तालुक्यात व शहरातील अनेक बार व अवैध मदिरा विक्री करणाऱ्याकडे विकल्या जात असून हे भेसळवजा चवीवरून लक्षात येऊ लागल्याची ओरड मोठ्या स्तरावर सुरू आहे.
मूल शहर व तालुक्यातील बार मालक आधीच तब्बल 35 ते 40 टक्के अधिक दराने तर अवैध दारू विकणारे(तालुक्यात ही संख्या 50 वर असल्याचे बोलले जाते) बार चे दरापेक्षा 50 ते 100 रूपये अधिक दराने विक्री करतात.आणि काही बार आणि रेस्टॉरंट मध्ये सुद्धा एम. आर.पी पेक्षा ५० ते १०० रुपये कमी किमतीत विकली जातात. जर दारू बनावट असेल तर बाम्बे लॉट चा माल शोरूम किमतीत विकण्याचा हा प्रकार दुप्पट नफा देणारा असला तरी भेसळयुक्त मदिरेतून मद्य शौकिनांच्या जिवाशी खेळण्याचा हा अक्षम्य गुन्हा प़शाशनाचे लक्षात का येत नाही ? हा गंभीर सवाल उपस्थित होऊ लागला आहे. डूप्लीकेट विदेशी दारू चे उत्पादन होत असल्याची चर्चा लक्षात घेता अशा दारूमुळे मदिरा पान करणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे यात काही शंका नाही. बनावट दारू बनविण्याचे कृत्य करणारे मुल तालुक्यातील, शहरातील कोरोना काळात बेधुंद दारू विकणारेच असल्याचीही चर्चा आहे. चोरीच्या, बेकायदेशीर धंद्यातून कमाईची चटक लागलेल्या या मंडळींनी आता चक्क डुप्लीकेट विदेशी दारूचा कारखाना चालवून हद्द पार केली व या कंपूस संरक्षण देऊन काही अधिकारी व स्थानिक लिडर म्हणविणाऱ्यानी माणुसकी विकली काय? हा संतप्त. सवाल पुढ्यात येऊ लागला आहे.गत काळात अनेक सालापासून सुरू असलेला बनावट देशी दारूचा कारखाना मूल तालुक्यातील चितेगावात गुन्हे शाखेने पकडला होता हे लक्षात घेता बनावट विदेशी दारुचा कारखाना मूल तालुक्यात असू शकतो यात शंका नाही सर्व मदिरा प्रेमींनी मात्र मद्यपान करतांना घबरदारी घेतली पाहिजे व चर्चा असलेल्या बनावट कंपनीपासून दूर राहीले पाहीजे
चर्चानुसार अशी बनते डुप्लीकेट दारू? चर्चेतून पुढे आलेल्या माहितीनुसार बनावट दारू बनवणारे सदर कंपनीची खाली बॉटल्स विकत घेतात. फक्त त्यावर नवीन कव्हर व झाकण लावून हुबेहूब आर. एस. ची नीप व ९० एम.एम. तयार करतात. जेणे करून मदिरा प्रेमींना ओळखता सुद्धा येणार नाही खुले आम हा धंदा चालू असताना प्रशासन काय तर मदिरा प्रेमींना सुद्धा माहीत नसते की ही दारू ओरिजनल आहे की डूप्लीकेट मदिरा प्रेमींना फक्त त्याचा आस्वाद घेण्याची घाई असते मग तो काय त्याची एक्सपायरी बघायची सुद्धा सवड नसते. मद्य शौकीनांना एक पॅक पोटात टाकायची घाई असते यामुळे चोर खुलेआम चोरी करून लाखो रूपये कमावतो व मदिराप्रेमी खाटेवर पडून दवाखान्याचे बिल भरतो. अमानवीय धंदा करणाऱ्यांवर वचक नसल्याने मूल तालुक्यात अवैध धंदे वाल्यांचे फावत चालले आहे हे असल्या भयावह धंद्यातून स्पष्ट होत आहे.गत काळात बनावट देशी दारू बनत असल्याच्या चर्चे कडे लक्ष देण्यात आले नाही व पुढे मात्र चक्क बनावट देशी दारूचा कारखानाच सापडला. तोवर मात्र कितीतरी देशी मद्य शौकिनांना यातून आयुष्य किती कमी झाले हे कळले नाही जर चचैत सत्यता असेल तर सदर चोरकंपूनी करोडो लागत न लावता फक्त ५० हजार ते लाख रुपयात येवढा मोठा व्यापार सुरू केला असेल यात शंका नसावी. याची दाद द्यायला हवी पण सर्वसामान्यांच्या जीवाशी चालणारा हा खेळ पोलिस प्रशासनान बनावट दारू बनविणाऱ्याच्या विरोधात योग्य ती कार्यवाही करून थांबविण्याची अपेक्षा रास्तच ठरते.
अतिथी मार्गदर्शक :- प्रा. महेश पानसे, पूर्व विदर्भ अध्यक्ष, म.रा.मराठी पत्रकार संघ मुंबई
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या