बल्लारपूर :- 5 सप्टेंबर भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो या दिनी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्या शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करतात. या दिनाचे औचित्य साधून बल्लारपूरातील स्थानिक महात्मा फुले महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाद्वारे शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
यानंतर विविध विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकार करून अध्ययन व अध्यापनाचे कार्य पार पाडले या प्रसंगी डॉ. किशोर चौरे, डॉ. विनय कवाडे, डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ. पंकज कावरे, डॉ. पल्लवी जुनघरे, डॉ. रजत मंडल, प्रा.स्वप्नील बोबडे, प्रा.सतिश कर्णासे, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. ले. योगेश टेकाडे, प्रा. पंकज नंदुरकर प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. श्रद्धा कवाडे, प्रा. विभावरी नखाते यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या