पंचायत समिती, बल्लारपूर व सर्वोदय विद्यालय बल्लारपूर चा संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनी व विक्री चे आयोजन (Panchayat Samiti, Ballarpur and Sarvodaya Vidyalaya Ballarpur jointly organized Taluka level book exhibition and sale)

Vidyanshnewslive
By -
0
पंचायत समिती, बल्लारपूर व सर्वोदय विद्यालय बल्लारपूर चा संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनी व विक्री चे आयोजन (Panchayat Samiti, Ballarpur and Sarvodaya Vidyalaya Ballarpur jointly organized Taluka level book exhibition and sale)


बल्लारपूर :-" वाचाल तर वाचाल ", " शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे याला जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. " या उक्ती प्रमाणे महावाचन उत्सव २०२४ अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनी चे उद्घाटन रविंद्र लामगे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बल्लारपूर यांचे हस्ते गजभे मुख्याध्यापिका सर्वोदय विद्यालय यांचा अध्यक्षेत झाले. प्रमुख पाहुणे संजयभाऊ कायरकर अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, शिक्षिका भोंड केंद्रप्रमुख बामणी, शिक्षक नागेंद्र कुमरे केंद्रप्रमुख विसापुर, रुपाली मामीडवार गटसाधन व्यक्ती पंचायत समिती बल्लारपूर होते. पंचायत समिती, बल्लारपूर व सर्वोदय विद्यालय बल्लारपूर चा संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनी व विक्री चे आयोजन १० सप्टेंबर रोजी सर्वोदय विद्यालयात आयोजित केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका पाजनकर पर्यवेक्षिका सर्वोदय विद्यालय यांनी केले. संचालन शिक्षिका मनीषा घुगुल तर आभार प्रदर्शन शिक्षिका सरिता बुटले यांनी केले. या प्रदर्शनात बावणे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख, लेखन आणि साहित्याच्या पदार्पण करणारे लेखक कवि नरेश बोरीकर, शिक्षिका प्रीति जगझाप जि.प. प्राथमिक शाळा बामणी, शिक्षिका अंजुमन बानू शेख जि. प. प्राथमिक शाळा कळमना यांनी पुस्तकाचे स्टॉल लावले होते. त्यात विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्य चे प्रदर्शनात ठेवण्यात आले होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)