धक्कादायक ! नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या (Shocking! A student who was preparing for the NEET exam committed suicide by hanging herself)

Vidyanshnewslive
By -
0
धक्कादायक ! नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या (Shocking! A student who was preparing for the NEET exam committed suicide by hanging herself)


चंद्रपूर :- नीट परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूरमध्ये उघडकीस आली आहे. प्रांजली राजूरकर असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. नीट क्लासेसच्या वसतिगृहातच प्रांजलीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. प्रांजली ही यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील रहिवासी आहे. बारावीनंतर तिने चंद्रपूर शहरातील इन्स्पायर कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतला. प्रांजली NEET परीक्षेची तयारी करत होती. संस्थेच्या मालकीच्या वसतिगृहातच ती राहत होती. बुधवारी सायंकाळच्या सुमारास खोलीत एकटी असतानाच तिने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आले नाही. मात्र अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहेत. तपासाअंती सत्य समोर येईल.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)