धक्कादायक ! ब्रम्हपुरी येथील शेतशिवारात विजेचा शॉक लागून 4 व्यक्तीचा मृत्यू, 1 जखमी (Shocking! 4 people died, 1 injured due to electric shock in Shetshiwar in Bramhapuri)
चंद्रपूर :- चंद्रपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे विजेचा शॉक लागल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतपिकांच्या संरक्षणासाठी शेतात सोडण्यात आलेल्या वीजतारांचा स्पर्श झाल्याने ही घटना घडली. ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर या गावात आज सकाळी अकरा वाजता सुमारास घडली. ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपुर येथील पुंडलिक मानकर (६५) चीचाखेडा, प्रकाश राऊत (४५), युवराज डोंगरे (४३),. नानाजी राऊत (५५) सर्व रा. गणेशापुर. यांचा विद्युत स्पर्शाने मृत्यू तर सचिन सुधाकर नन्नावरे (३५) गणेशपुर जखमी किरकोळ जखमी झाल्याची घटना आज सकाळी 10 वाजताच्या दरम्यान घडली. तिघे शेतकरी गणेशपूर या गावातील तर एक शेतकरी चिचखेडा गावातील रहिवासी आहे. विजेचा तारांचा शॉक या चौघांना लागला अन् ही दुर्दैवी घटना घडली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या