महाराष्ट्र ओ.बी.सी. प्रमुख श्री कल्याणराव आखाडे यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल नियुक्त आमदारामध्ये वर्णी लावण्याची मागणी (Maharashtra O.B.C. Demand to list Chief Shri Kalyanrao Akhade as MLA appointed by the Governor of Maharashtra State)

Vidyanshnewslive
By -
0
महाराष्ट्र ओ.बी.सी. प्रमुख श्री कल्याणराव आखाडे यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल नियुक्त आमदारामध्ये वर्णी लावण्याची मागणी (Maharashtra O.B.C. Demand to list Chief Shri Kalyanrao Akhade as MLA appointed by the Governor of Maharashtra State)
वृत्तसेवा :- मा.खा.सुनिलजी तटकरे साहेब, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांना पत्राद्वारे महाराष्ट्र ओ.बी.सी. प्रमुख श्री कल्याणराव आखाडे यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल नियुक्त आमदारामध्ये वर्णी लावण्या करीता विनंती. करण्यात आली असून वरील विषयास अनुसरुन मी बालाजी पाटील गौड प्रदेश उपाध्यक्ष ओ.बी.सी.विभाग आपणास विनंती करु ईच्छीतो की, आमचे मार्गदर्शक श्री कल्याणजी आखाडे साहेब हे महाराष्ट्रा मधील ओ.बी.सी. संघटन चांगल्या प्रकारे मजबुत केले आहे. व तसेच वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करुन पक्षाची मजबुत बांधनी करण्या करीता वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात मागील पाच महिण्यात नांदेड जिल्हयात तीन संपर्क दौरे करुन पक्षाची संघटनात्मक बांधनीचा आढावा घेतला व त्यांची काम करण्याची पध्दत व शैली अत्यंत चांगली आहे. त्यांचे व कृत्य शैली वर ओ.बी.सी. समाज आकर्षीत होत आहे. व पक्षात काम करण्यास ईच्छुक आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणुन आपणास विनंती करतो की, ते आमदार झाल्यास निश्चीत पक्षाला बळकटी येईल. आपला विश्वासु बालाजी पाटील गौड प्रदेश उपाध्यक्ष ओ.बी.सी.विभाग यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)