बल्लारपूर पोलिसांची कारवाई, म्यान मध्ये असलेल्या तलवारसह एका युवकाला अटक (Action by Ballarpur police, arrest a youth with sword in sheath)
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक निर्माण करण्याच्या दृष्टीने दि. ३ सप्टेंबर ला बल्लारपूर पोलीस स्टेशन चे डी. बी. पथक टेकडी विभागात तान्हा पोळा निमित्त गस्त करीत असताना त्यांना विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की आरोपी अर्जुन राजू कैथवास (२६) रा. मौलाना आझाद वॉर्ड हा वार्डातील लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देश्याने तलवार बाळगून आहे. या संदर्भात आरोपी अर्जुन ला विचारले असता त्याने उडवा उडविचे उत्तर दिले. या वरून त्याचा घराची झडती घेत असता त्यांना घरातील पान्यावर लाल रंगाच्या म्यान मध्ये लोखंडी तलवार मिळून आली. आरोपी अर्जुन राजू कैथवास याला अटक करून कलम ४, २५ भारतीय हत्यार कायद्यान्वये कारवाई करण्यात आले आहे. सणासुदीच्या तोंडावर गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याकरिता रेकॉर्ड वरील गुन्हेगाराचा शोध घेत असता एका आरोपीचा घरून तलवार जप्त केले आहे. सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनिल वि. गाडे यांचा नेतृत्वात सफौ. गजानन डोहीफोडे, पोहवा सत्यवान कोटनाके पोहवा. रणविजय ठाकुर, पोहवा संतोष दंडेवार, पोशी श्रिनिवास वाभिटकर, लखन चव्हाण, चंद्रशेखर कारूष, वशिष्ट रंगारी, मिलिंद आत्राम, शेखर माथनकर, मपोशी अनिता नायडू सह डीबी पथकांनी केली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या