चंद्रपूर जिल्ह्यातील OYO हॉटेल्स ची कायदेशीर चौकशी करा - नरेंद्र सोनारकर (Make a legal inquiry about OYO Hotels in Chandrapur district - Narendra Sonarkar)
बल्लारपूर - उडिसा च्या अग्रवाल ग्रुप च्या माध्यमातून यांनी 2013 मध्ये स्थापित केलेले ओयो हॉटेल चे भारतभर स्थापत्य झाले. व यातून देशाच्या विविध भागात हजारो ओयो ची सरकारी ठायी नोंदही झाली. मात्र नियमांची ऐशी तैशी करून गल्ली बोळात बुजगावण्या सारखे निर्माण होणारे ओयो हे कपल्स व प्रेमीयुगलांना शरीरसुख भोगण्यासाठीचे ठिकाण बनले की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. परिणामता फक्त नफा कमविण्याच्या उद्देश असल्याने अनेक ओयो संचालक ग्राहकांच्या मूळ कागद पत्रांची पृष्टी न करता त्यांना रूम उपलब्ध करून देतात. यात काही अल्प वयीन मुली बळी पडतात. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ओयो हॉटेल्स ची कायदेशीर चौकशी करून बेकायदेशीर ओयो हॉटेल्सवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य संघटक नरेंद्र सोनारकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून केली आहे. विशेष म्हणजे नुकतीच एक दुर्दैवी घटना बल्लारपुरात घडली असून, या घटनेत ओयो संचालकाच्या अक्षम्य चुकीमुळे एका अल्प वयीन मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती असून समाजात होणाऱ्या भीती आणी बदनामी मुळे त्या पीडित मुलीलाच आत्महत्या करून तिला आपला जीव गमवावा लागला....
चंद्रपूर जिल्ह्यातिल अनेक शहरात हे ओयो हॉटेल्स गल्ली बोळात उभारले गेले याची परवानगी घेण्यात आली आहे का? तसेच प्रत्येक हॉटेल्स संचालकांनी वैध कागदपत्रे असल्याची खात्री करूनच आपल्या हॉटेल्स च्या रूम उपलब्ध करून द्याव्या याची संबंधित विभागा मार्फत कायदेशीर चौकशी होणे महत्वाचे आहे. कारण बल्लारपूर येथील घटना उघडकीस आल्या नंतर इतर हॉटेल्स मध्ये असले प्रकार घडत नसतील, हे कशावरून..? असा प्रश्न सोनारकर यांनी उपस्थित केला आहे. या संबंधाने पुरोगामी पत्रकार संघाचे एक शिष्ट मंडळ लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. आज राज्यातच नव्हे देशात वासना अंधांनी कळस गाठला आहे. आई, बहिणी सह 4-5 वर्षाच्या चिमूरड्या ही सुरक्षित नाही अशा भिषण अवस्थेत, पोलीस विभाग, पालक वर्ग, शिक्षक वर्ग, आणी जागरूक नागरिकांनी अशा घटनेला लगाम लावण्यासाठी सज्ज झाले पाहिजे असेही आवाहन पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य संघटक नरेंद्र सोनारकर यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या