बल्लारपूर :- बल्लारपूर शहरात 3 सप्टेंबरला घडलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात शिवम दिनेश दुपारे वय - 20 वर्ष याला पूर्वीच अटक करण्यात आली होती तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी आणखी 2 व्यक्तींना अटक करण्यात आल्याची माहिती आहे या संदर्भात अधिक माहितीनुसार अल्पवयीन युवतीवर ज्या लॉज मध्ये लैंगिक अत्याचार झाला त्या लॉज चे व्यवस्थापक राकेश दीनानाथ पांडे वय - 52 व शिपाई म्हणून कार्यरत असलेले बंडू बळीराम कामटकर वय - 62 यांना अटक करण्यात आली असून त्यांचेवर बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार (पास्को) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या