चंद्रपूरच्या दीक्षाभूमीचे स्वरूप बदलणार, दीक्षाभूमीसाठी ५६ कोटी ९० हजाराचा निधी प्रस्तावित (The form of Dikshabhumi of Chandrapur will change, a fund of 56 crore 90 thousand is proposed for Dikshabhumi)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूरच्या दीक्षाभूमीचे स्वरूप बदलणार, दीक्षाभूमीसाठी ५६ कोटी ९० हजाराचा निधी प्रस्तावित (The form of Dikshabhumi of Chandrapur will change, a fund of 56 crore 90 thousand is proposed for Dikshabhumi)


चंद्रपूर :- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगात नागपूर आणि चंद्रपूर अशा दोनच ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. नागपूर येथील दीक्षाभूमीचा विकास झाला आहे, मात्र चंद्रपूर येथील दीक्षाभूमी अविकसित राहिली होती. येथे देशभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या, परिणामी येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होत होती. या अनुषंगाने दीक्षाभूमीच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार प्रयत्नशील होते. आमदार किशोर जोरगेवार यांनी पहिल्याच हिवाळी अधिवेशनात दीक्षाभूमीच्या विकासासाठी एकत्रित १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी सदर मागणी सातत्याने लावून धरली होती. त्यांनी दीक्षाभूमी समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घडवून आणली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चंद्रपूर दीक्षाभूमीचा लवकरच कायापालट होणार आहे. तीन मजली इमारत बांधण्यात येणार आहे. इमारतीसाठी लागणारे विद्युत जोडणी, अग्निशमन यंत्रणा, फर्निचर, पाणी पुरवठा यंत्रणा, सुरक्षा भिंत, दीक्षाभूमी परिसरातील रोड, सांडपाणी व्यवस्थापन यंत्रणा, ६५ फुटाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, स्थिम पार्क, म्युरल, पार्किग व्यवस्था, वातानुकूलित यंत्रणा, सीसीटिव्ही इत्यादी बाबी अंर्तभूत करण्यात आल्या आहे. तसेच सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच चंद्रपूर दीक्षाभूमीचे रूपडे पालटणार आहे. निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतरच कामाला सुरुवात होणार आहे. प्रदान केली आहे.
            राज्य शासनाने अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील मान्यवर व्यक्तींची स्मारके बांधणे तसेच ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या स्थळांचा विकास करणे या योजनेंतर्गत चंद्रपूर दिक्षाभूमीचा सर्वांगिण विकास करणे शासनाच्या विचाराधीन होते. याबाबतचा प्रस्ताव उच्चस्तरीय सचिव समितीसमोर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. दिक्षाभूमीचा सर्वांगिण विकास करण्यासाठी ५६ कोटी ९० रुपयांचा निधीस शासनाने प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने चंद्रपूरची पवित्र दीक्षाभूमी पावन झालेली आहे. या दीक्षाभूमीवर दरवर्षी १५ व १६ ऑक्टोंबर रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या कार्यक्रमाला देशविदेशातील बौद्ध बांधव येथे एकत्र येतात. तसेच विदर्भातील बौद्ध बांधवांची हजारोंच्या संख्येने गर्दी उसळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाची या दिवशी शोभायात्रा काढण्यात येते. तसेच अस्थिकलश दर्शनासाठी दीक्षाभूमी येथे ठेवण्यात येतो. हजारो बौद्ध बांधव या अस्थिकलशाचे दर्शन घेतात. यामध्ये तीन मजली इमारत बांधण्यात येणार आहे. इमारतीसाठी लागणारे विद्युत जोडणी, अग्निशमन यंत्रणा, फर्निचर, पाणी पुरवठा यंत्रणा, सुरक्षा भिंत, दीक्षाभूमी परिसरातील रोड, सांडपाणी व्यवस्थापन यंत्रणा, ६५ फुटाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, स्थिम पार्क, म्युरल, पार्किग व्यवस्था, वातानुकूलित यंत्रणा, सीसीटिव्ही इत्यादी बाबी अंर्तभूत करण्यात आल्या आहे. तसेच सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच चंद्रपूर दीक्षाभूमीचे रूपडे पालटणार आहे. निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतरच कामाला सुरुवात होणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)