बल्लारपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक येत्या 15 ऑगस्ट पर्यत जनतेसाठी खुले करावे - वंचित बहुजन आघाडीचे प्रशासनाला निवेदन (Ballarpur City Dr. Babasaheb Ambedkar's memorial should be opened for public till August 15 - Vanchit Bahujan Aghadi's statement to the administration)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक जुनी नगरपरिषद चौक बल्लारपूर येथे असलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची दुरुस्ती करण्यासाठी मागील जून महिन्यापासून बंद ठेवण्यात आले होते. परंतु मागील तीन महिने लोटूनही कामे पूर्ण झाले नाही. त्याकरिता नगर परिषदेने याकडे तातडीने लक्ष देऊन येणाऱ्या १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा त्वरित सर्वसामान्य जनते करिता खुले करण्यात यावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा पुतळा सर्वसामान्य जनतेला मार्गदर्शन प्रेरीत करणारा असून ते मुख्य आकर्षण सुद्धा आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर करून सर्वसामान्य जनतेकरीता खुले करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी ने निवेदन दिले. यासंदर्भात आज ६ ऑगस्ट ला वंचित बहुजन युवा आघाडी बल्लारपूर यांच्यातर्फे विशाल वाघ मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद बल्लारपूर यांना निवेदन देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा १५ ऑगस्ट पर्यंत सर्वसामान्य जनतेकरीता खुले करण्यात यावा. या वेळी वंचित बहुजन युवा आघाडी चे तालुकाध्यक्ष अभिलाष चुनारकर, अश्विन शेंडे वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा सदस्य, सुदेश शिंगाडे वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा सदस्य, शुभम सोनटक्के, सोहन वनकर, सागर गेडाम सह कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)