बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा फुले महाविद्यालयाच्या गृह अर्थशास्त्र विभागाच्या वतीने स्वयंरोजगार उपक्रमा अंतर्गत खाद्य पदार्थ (शेंगदाणे चटणी, मिरची चटणी, तीळ चटणी, जवस चटणी, चहा मसाला) ई पदार्थ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः बनवून त्या पदार्थाच प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उदघाट्न महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण यांनी केले. यावेळी विचार मंचावर डॉ. किशोर चौरे, डॉ. रजत मंडल, प्रा. विभावरी नखाते गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. बादलशाह चव्हाण सर म्हणालेत की " विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करावा तसेच अशा प्रकारच्या विविध उपक्रमातून विकास साध्य करण्याचा प्रयत्न करून विविध स्वरूपाच्या वस्तूची निर्मिती करून भविष्यात बचत गटाच्या माध्यमातून आपल्या वस्तूच्या विक्रीच प्रदर्शन करावं. "
यावेळी विचार मंचावर उपस्थितानी आपल मनोगत व्यक्त केल यावेळी विद्यार्थ्यांद्वारे निर्मित खाद्य पदार्थाच्या वस्तूची खरेदी महाविद्यालयातील प्राध्यापकानी करून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. यावेळी डॉ. विनय कवाडे, डॉ. रोशन फुलकर, डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ. पंकज कावरे, डॉ. पल्लवी जुनघरे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. सतिश कर्णासे, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. ले. योगेश टेकाडे, प्रा. ललित गेडाम, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. श्रद्धा कवाडे यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या