लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजणार, निवडणूक आयोगाकडून उद्या दुपारी 3:00 वाजता घोषणा होण्याची शक्यता (Loksabha election bugle will sound, election commission is likely to announce at 3:00 pm tomorrow)

Vidyanshnewslive
By -
0

लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजणार, निवडणूक आयोगाकडून उद्या दुपारी 3:00 वाजता घोषणा होण्याची शक्यता (Loksabha election bugle will sound, election commission is likely to announce at 3:00 pm tomorrow)

नवी दिल्ली :- लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजणार असून शनिवारी (16 मार्च) रोजी केंद्रीय निवडणूक आयोग याची घोषणा करणार आहे. निवडणूक आयोगाने दुपारी 3 वाजता या संदर्भात पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीची घोषणा केली जाईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तडकाफडकी राजीनामा दिला होता. तर निवडणूक आयुक्तांचे एक पद आधीच रिक्त आहे. या दोन्ही पदांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने माजी सनदी अधिकारी सुखबीर सिंह संधू आणि ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती केली. त्यानंतर शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.
           जवळपास 45 मिनिटं ही बैठक सुरू होती. या बैठकीनंतर शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. निवडणूक आयोगाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याचे लाईव्ह स्ट्रिमिंग केले जाईल. निवडणुकीची घोषणा होताच देशभरात आचारसंहिता लागेल. सूत्रांच्या माहितीनुसार, सात ते आठ टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)