लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमएचटी-सीईटीसह परिक्षाच्या वेळापत्रकात बदल, सुधारित वेळापत्रक जाहीर (Changes in exam schedule including MHT-CET in the wake of Lok Sabha elections, revised schedule announced)

Vidyanshnewslive
By -
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमएचटी-सीईटीसह परिक्षाच्या वेळापत्रकात बदल, सुधारित वेळापत्रक जाहीर (Changes in exam schedule including MHT-CET in the wake of Lok Sabha elections, revised schedule announced)
वृत्तसेवा :- राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेतल्या जाणार्‍या प्रवेश परीक्षांच्या (सीईटी) नियोजनात लोकसभा निवडणुकीमुळे बदल करण्यात आला आहे. त्यानुसार परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या असून, त्यात एमएचटी-सीईटीसह विविध आठ परीक्षांचा समावेश आहे. 16 ते 30 एप्रिल या कालावधीत एमएचटी-सीईटी होणार होती. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सीईटी सेलच्या वेळापत्रकानुसार एमएचटी-सीईटीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (पीसीबी) गटाची परीक्षा 22, 23, 24, 28 29, 30 एप्रिल रोजी, तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम) गटाची परीक्षा 2, 3, 4, 5, 9, 10, 11, 15, 16 मे रोजी होणार आहे. उपयोजित कला अभ्यासक्रम सीईटी 12 मे रोजी, बीए-बीएस्सी बीएड चार वर्षे एकात्मिक अभ्यासक्रम सीईटी 17 मे रोजी, पाच वर्षे विधी अभ्यासक्रमा साठीची सीईटी 17 मे, नर्सिंग सीईटी 18 मे, हॉटेल मॅनेजमेंट पदवी सीईटी 22 मे, बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीए सीईटी 27 ते 29 मे रोजी होणार आहे. सुधारित वेळापत्रक सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सीईटी सेलने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. सीईटी सेलकडून जवळपास 20 अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या प्रवेश प्रक्रियेसाठी परीक्षांचे वेळापत्रक सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आले होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)