बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयात बल्लारपूर येथे दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. विनय कवाडे सर यांनी भावी काळात उद्योग किंवा व्यवसायाचे महत्त्व व MSME आणि महिला सशक्तिकरण अंतर्गत येणारे व्यवसाय तसेच त्यासाठी करावे लागणारे प्रशिक्षण आणि व्यवसायासाठी कर्जाची उपलब्धता सबसिडी याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले तर प्राध्यापक डॉ. रोशन फुलकर सर यांनी उद्योजक होण्यासाठी मानसिकरित्या कशी तयारी करायची व व्यवसाय निवडीची पूर्वतयारी कोणत्या पद्धतीने करायची याबद्दल मार्गदर्शन केले प्राध्यापक दिवाकर मोहितकर सर यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करणे हे भविष्याची कशी गरज आहे हे विद्यार्थ्यांना सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ बी डी चव्हाण सर यांनी नोकरीला स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय कसा उत्तम पर्याय असतो व विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत उद्योग किंवा व्यवसाय बद्दल कसे मार्गदर्शन मिळवायचे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक ललित गेडाम तर आभार प्रदर्शन प्राध्यापक रोशन साखरकर यांनी केले या कार्यक्रमाला प्राध्यापक डॉ किशोर चौरे सर प्राध्यापक डॉ सुनील कायरकर सर यांच्या सह कनिष्ठ व वरिष्ठ विभागाच्या सर्व प्राध्यापकासह शिक्षकेत्तर कर्मचारी वरिष्ठ लिपिक प्रकाश मेश्राम तसेच (अकरावी व बारावीचे) कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या