डिजिटल अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सोय उपलब्ध करून देणार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व अभ्यासिका उपक्रम (Doctor Babasaheb Ambedkar library and study program will provide convenience to students through digital textbooks)

Vidyanshnewslive
By -
0
डिजिटल अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सोय उपलब्ध करून देणार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व अभ्यासिका उपक्रम (Doctor Babasaheb Ambedkar library and study program will provide convenience to students through digital textbooks)
बल्लारपूर :- दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी गौतमी महिला मंडळ संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व अभ्यासिका तसेच लोक कल्याणकारी संघर्ष समिती बल्लारपूर, तालुका बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जाहीर शैक्षणिक प्रबोधन व मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर शैक्षणिक प्रबोधन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. अनुप कुमार सर संचालक नालंदा अकॅडमी वर्धा तथा माजी विद्यार्थी  जे एन यु विश्वविद्यालय नवी दिल्ली व मा. एडवोकेट दीपक चटप सर,  ग्लोबल चेवीनिंग स्कॉलरशिप विजेता ब्रिटिश सरकार सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा. प्रमोद शंभरकर सर राज्यशास्त्र विभाग प्रमुख सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर तथा सचिव डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, मा. डॉ. भास्कर सोनारकर तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक व स्वागताध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर विजय कळस्कर  वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर ई ची विचार पिठावर उपस्थिती होती.
          सदर कार्यक्रमांमध्ये माननीय एडवोकेट दीपक चटप सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हंटले की, प्रत्येक विद्यार्थी हा कोणत्या ना कोणत्या विषयात पारंगत असतो त्यामुळं विद्यार्थ्यांनी त्या सुप्त गुणांचा उपयोग करून घ्यावा तसेच जागतिक स्तरावर अभ्यासक्रमाविषयीं दक्ष राहून विविध शिष्यवृत्ती च्या माध्यमातून आपला ज्ञानात भर टाकावी. यानंतर मा. अनुप कुमार सरांनी ग्रामीण भागातील (बेंबाळ, नांदगाव, कोठारी, कळमना, दहेली, मानोरा, विसापूर इत्यादी) विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, या जगातले पहिले वैज्ञानिक तथागत भगवान बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय समाजातील गरीब व दिन दुबळ्या घटकातील विद्यार्थ्यांना नालंदा अकडमी वर्धा च्या माध्यमातून 10 महिन्याचं प्रशिक्षण दिले जाते तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी मी हे करू शकतो ही भावना जोपासली पाहिजे या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात सदर कार्यक्रमात उपस्थित होते त्यांना अतिशय मोलाचे शैक्षणिक मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुद्धशील बहादे यांनी केले  तर आभार प्रदर्शन पूनम कांबळे ताई यांनी केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता संपूर्ण गौतमी महिला मंडळ तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय  व अभ्यासिका कृती समिती तसेच लोक कल्याणकारी संघर्ष समितीच्या सर्व सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)