पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली सत्र सुरूच, पोलीस निरीक्षक दर्जाच्या 3 अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या तर 3 नवीन पोलीस अधिकारी जिल्ह्यात दाखल होणार (The transfer session of police officers continues, 3 police inspectors will be transferred out of the district while 3 new police officers will enter the district.)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग व पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शक सूचनाच्या अनुषंगाने नागपूर परीक्षेत्राअंतर्गत निःशस्त्र पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यानुसार चंद्रपूर जिल्हा पोलीस विभागा अंतर्गत 3 पोलीस निरीक्षक श्री सतिशसिंग राजपूत यांची नागपूर ग्रामीण तर श्री मनोज चांगोराव गभने व श्री रविंद्र मुक्ताराम शिंदे यांची वर्धा येथे बदली झाली असून श्री सुनिल विठ्ठलराव गाडे व श्री दारासिंग दौलत राजपूत वर्धा येथून तर श्री यशवंत सटवा कदम हे पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी जिल्ह्यात दाखल होत आहे. एकूणच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस दलात खांदेपालट होत असून येत्या काही दिवसात जिल्ह्यातील अनेक महत्वपूर्ण पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त होत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)