अन ते तीन डॉक्टर 'दिव्यांगी' साठी देवदूत ठरलेय, अथक प्रयत्नातून वाचविले प्राण Those three doctors have become angels for 'Divyangi', saving lives through tireless efforts

Vidyanshnewslive
By -
0

अन ते तीन डॉक्टर 'दिव्यांगी' साठी देवदूत ठरलेय, अथक प्रयत्नातून वाचविले प्राण Those three doctors have become angels for 'Divyangi', saving lives through tireless efforts 

चंद्रपूर :- बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील दिव्यांगी उमरे ही १४ वर्षीय मुलगी घरी झोपण्यासाठी गेली असता, ब्लँकेटमध्ये भला मोठा जहाल विषारी मण्यार जातीचा साप होता. दिव्यांगीने ब्लॅकेट अंगावर घेताच सापाने तिच्या हाताच्या बोटाला चावा घेतला.   या मुलींला गंभीर अवस्थेत मुलीला बेंदले रुग्णालयात दाखल करण्यात आले. सापाचे विष मुलींच्या संपूर्ण अंगभर पसरल्याने प्रकृती अधिकच गंभीर झाली होती. मुलीला दोन दिवस कृत्रिम श्वसनप्रणालीवर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. डॉ. आनंद बेंदले, डॉ. सुनील दीक्षित व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. स्वप्निल पुणेकर या तीन डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर मुलीचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. जनरल फिजिशन, भूलतज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ हे तीन डॉक्टर दिव्यांगी हिच्यासाठी देवदूत ठरले. कुटुंबीयांनी तिला डॉ. आनंद बेंदले यांच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र विष संपूर्ण शरीरात पसरल्याने आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. शंभर एन्टी स्नेक इंजेक्नशचा डोस संपूर्ण अंगभर विष पसरल्याने दिव्यांगी हिला एकाचवेळी १०० एन्टी स्नेक इंजेक्शन लावण्यात आले. मेडिकलमध्ये केवळ ३५ इंजेक्शन उपलब्ध होते. मात्र सतीश निंबाळकर यांनी धावपळ करून ५० इंजेक्शन तातडीने उपलब्ध करून दिले. दोन दिवसानंतर दिव्यांगीची प्रकृती पूर्वपदावर आली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)