भव्य विक्री व प्रदर्शनीचे उदघाटन, महिला बचतगटांचे ३५ स्टॉल्स स्पर्धात्मक जगात गुणवत्ता व ऑनलाईन विक्रीवर भर दयावा - अतिरिक्त आयुक्त श्री. चंदन पाटील Inauguration of grand sale and exhibition, 35 stalls of women's savings groups Emphasis on quality and online sales in competitive world - Additional Commissioner Shri. Chandan Patil

Vidyanshnewslive
By -
0

भव्य विक्री व प्रदर्शनीचे उदघाटन, महिला बचतगटांचे ३५ स्टॉल्स स्पर्धात्मक जगात गुणवत्ता व ऑनलाईन विक्रीवर भर दयावा - अतिरिक्त आयुक्त श्री. चंदन पाटील Inauguration of grand sale and exhibition, 35 stalls of women's savings groups Emphasis on quality and online sales in competitive world - Additional Commissioner Shri. Chandan Patil

चंद्रपूर -: सध्याचे जग हे स्पर्धात्मक असुन बचतगटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करतांना वस्तूची गुणवत्ता कशी सर्वोत्तम असेल यावर व ऑनलाईन माध्यमातुन वस्तूंची विक्री करण्यावर भर द्यावा असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त श्री. चंदन पाटील यांनी भव्य विक्री व प्रदर्शनीच्या उदघाटन प्रसंगी केले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे दिनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत दि.३ ते ७ नोव्हेंबर दरम्यान महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांची विक्री व प्रदर्शनी ज्युबली शाळेजवळ असलेल्या कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केली गेली असुन या भव्य विक्री व प्रदर्शनीचे उदघाटन अतिरिक्त आयुक्त श्री. चंदन पाटील यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांची विक्री व प्रदर्शनी हा नाविन्यपुर्ण उपक्रम असुन याचा ज्यास्तीत ज्यास्त महिलांनी लाभ घ्यावा. महिलांनी अधिक चांगल्या प्रकारच्या वस्तु,पदार्थ तयार करावे व केवळ ५ दिवसांच्या विक्री व प्रदर्शनीवर न थांबता वर्षभर विविध वस्तुंच्या विक्रीद्वारे आर्थिक नियोजनावर भर देण्याचेही त्यांनी सांगितले.     

     सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत सुरु असणाऱ्या या विक्री व प्रदर्शनीत ३५ स्टॉल्स असुन नागरिकांना स्वस्त दरात मुबलक खाद्य पदार्थ व वस्तु घेता येणार आहे. यात दिवाळी सणानिमित्त महिला बचत गटांनी तयार केलेले चकली, चिवडा, लोणचे, फराळी वस्तूंचा आस्वाद घेता येणार आहे तसेच कापडी बॅग, दिवे, मातीच्या वस्तु अश्या अनेक वस्तुही विक्रीस राहणार आहेत. सदर विक्री व प्रदर्शनी ३ ते ७ नोव्हेंबर पर्यंत असल्याने नागरिकांना भेट देण्यास ५ दिवस मिळणार आहे. तसेच सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत सुरु असल्याने सर्व वयोगटाच्या व्यक्तींना भेट देता येणार आहे. शहरातील नागरिकांनी महिला स्वयंसाह्य बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंची खरेदी करून बचत गटातील महिलांना व्यवसाय करण्याकरिता हातभार लावावा तसेच बचतगटांनी तयार केलेल्या चविष्ट व्यंजनांचा आस्वाद घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. याप्रसंगी उपायुक्त श्री. मंगेश खवले, सहायक आयुक्त श्री. सचिन माकोडे, विधी अधिकारी श्री. अनिलकुमार घुले, शहर अभियान व्यवस्थापक श्री. रफीक शेख, रोशनी तपासे, चिंतेश्वर मेश्राम, खडसे, लोणारे, मुन, करमरकर उपस्थीत होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)