शील समाधि आणि प्रज्ञा या त्रिसुत्राचा अंगीकार करावा... भंते प्रज्ञानंद One should adopt the trisutra of Sheela Samadhi and Prajna... Bhante Pragyananda

Vidyanshnewslive
By -
0
शील समाधि आणि प्रज्ञा या त्रिसुत्राचा अंगीकार करावा... भंते प्रज्ञानंद One should adopt the trisutra of Sheela Samadhi and Prajna... Bhante Pragyananda
बल्लारपूर :- आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेच्या पर्यंतचा काळ हा वर्षावासाचा असतो या काळात वंदनीय भिक्षु संघा द्वारे धम्माचा प्रचार प्रसार केला जातो व या अनुषंगाने भिक्षु निवास पाली विद्यालय बुध्द विहार, विद्यानगर बल्लारपुर  येथे वर्षावास समाप्तीच्या कार्यक्रमात भन्ते प्रज्ञानंद यांनी धम्मदेसना करित असताना वरील उद्गार काढले. अहंकार हा अतिशय घातक असून मानसाला अधोगतीकड़े नेणारा आहे. ध्यानाचा अवलंब केल्याने आपल्या क्लेशावर विजय प्राप्त करता येतो असा उपदेश त्यांनी केला. सुरुवातिला भन्तेनी त्रिशरण पंचशील दिले आणि बुध्दपुजा, त्रिरत्न वंदना,सुत्ताचे पठण करण्यात आले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यानंतर सहभोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने उपासक उपासिकांनी सहभाग दर्शाविला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)