दुर्गापूर सबएरिया कार्यालयाला उलगुलान संघटनेने घातला घेराव, मृत बालकाच्या कुटुंबाला मिळाली आर्थिक मदत Durgapur subarea office besieged by Ulgulan organization, family of dead child gets financial aid

Vidyanshnewslive
By -
0
दुर्गापूर सबएरिया कार्यालयाला उलगुलान संघटनेने घातला घेराव, मृत बालकाच्या कुटुंबाला मिळाली आर्थिक मदत Durgapur subarea office besieged by Ulgulan organization, family of dead child gets financial aid 
चंद्रपूर :- शहरालगत असलेल्या दुर्गापूर येथील वेकोलीच्या फिल्टर प्लांट येथे पोहायला गेलेल्या 12 वर्षीय बालकाचा मंगळवारी पाण्यात बुडून मृत्यू झाला. प्रेम वाघमारे असे मृतकाचे नाव आहे.याची माहिती उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वेकोलीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत आर्थिक नुकसानभरपाई ची मागणी करण्यात आली.मात्र नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या वेकोलीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत त्यांना कार्यालयात डांबून ठेवले. त्यानंतर मुख्य महाप्रबंधक, कार्मिक अधिकाऱ्यांनी मृतकाच्या कुटुंबियांना 25 लाखांची आर्थिक मदत देण्याचे मान्य केले. मंगळवारी परिसरातील काही मुले वेकोलीच्या फिल्टर प्लांट येथे पोहायला गेले होते. मात्र प्रेम वाघमारे याचा दुर्दैवी मृत्यू झाला.त्यानंतर वेकोली कार्यालयात चांगलंच गोंधळ उडाला. राजू झोडे व के के सिंग यांनी तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली.त्यानंतर ही मागणी रात्री उशिरा मान्य करण्यात आली. उपस्थित अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले. यावेळी पोलीस अधिकारी, वेकोली अधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी आंदोलनात के के सिंग, राजु झोडे रविन्द्र मोटगरे, सुनिल बैरेकर, सचिन मांदाने, श्यामभाऊ झिलपे, आशिफ पठान, गुरु भगत, रवि पवार, आनंद इंगडे, रामभाऊ,आदि  नागरिक उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)