बल्लारपुरात विद्यार्थ्यांनी काढली "तिरंगा रॅली" प्रशासनाच्या वतीने वीरपत्नीचा सत्कार ("National flag rally" held by students in Ballarpur felicitated Veerapatni on behalf of the administration)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपुरात विद्यार्थ्यांनी काढली "तिरंगा रॅली" प्रशासनाच्या वतीने वीरपत्नीचा सत्कार ("National flag rally" held by students in Ballarpur felicitated Veerapatni on behalf of the administration)

बल्लारपूर :- आज संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे समारोपीय वर्ष साजरे होत असतांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने "मेरी माटी मेरा देश " हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवित असतांना बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या अनुषगाने तिरंगा रॅली व वीरपत्नीचा सत्कार या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे साईबाबा ज्ञानपीठ व दिलासाग्राम कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली काढण्यात आली होती या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. कांचन जगताप, तहसीलदार बल्लारपूर, उमेश पाटील, पोलीस निरीक्षक बल्लारपूर, सपोनि शैलेश ठाकरे, पोउनि चेतन टेम्भूर्णे, हुसेन शाह, सलीम शेख, रवी चेपुरवार, लोकेश नायडू, विश्वजित चंदेल इ ची उपस्थिती होती. यावेळी डॉ. कांचन जगताप, तहसीलदार बल्लारपूर यांच्या हस्ते नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या नितीन घोडमारे यांच्या पत्नी एकता नितीन घोडमारे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच पोलीस सेवेतून निवृत्त झालेल्या पोलीस कर्मचारी यादव व चौधरी यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचं संचालन श्रीनिवास सुंचूवार यांनी तर आभार प्रदर्शन शैलेश ठाकरे यांनी केले यावेळी पोलीस कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)