चंद्रपुर येथे 27 आगस्ट 23 रोजी होणाऱ्या बि. ई. एफ राज्य अधिवेशनाच्या निमीत्ताने....! (On the occasion of Bahujan Employees Federation State Convention to be held at Chandrapur on 27 August 23....!)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपुर येथे 27 आगस्ट 23 रोजी होणाऱ्या बि. ई. एफ राज्य अधिवेशनाच्या निमीत्ताने....! (On the occasion of Bahujan Employees Federation State Convention to be held at Chandrapur on 27 August 23....!)

चंद्रपूर :- हजारो वर्षापासुन वर्ण व जाती व्यवस्थे मुळे भारतीय समाजात सामाजिक-आर्थिक विभाजन निर्माण झाले. या व्यवस्थेने शुद्र-अतिशुद्र  वर्गावर पराकोटीची गुलामी लादली. या वर्गाचा शिक्षण व संपत्तीचा अधिकार नाकारला. त्यामुळे देशातील कष्टकरी, शेतकरी, मजुर व कामागार सामाजिक व आर्थिक गुलाम झाले.  एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश भारतात झपाट्याने औद्योगिक क्रांती होत असतांना भांडवलशाही जोर पकडत होती. या व्यवस्थे मुळे शेतकरी, मजुर, कामगार वर्गाचे दुहेरी शोषण सुरु झाले. या शोषणाच्या विरोधात सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी बंड पुकारले. 1884 साली नारायण मेघाजी लोखंडे यांनी " बाँम्बे मिल हँडस् असोसिएशन " ची स्थापना करुन भारतीय कामगार चळवळीची मुहुर्तमेढ रोवली.

    पुढे विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राम्हणशाही व भांडवलशाही विरुध्द शोषात-पिडीत  कष्टकरी, शेतकरी, शेतमजुर व कामगारांच्या समता व स्वातंत्र्य लढ्याला गतीमान केले. हा लढा लढण्यास त्यांनी 15 आगस्ट 1936 साली "स्वतंत्र मजुर पक्ष" स्थापन केला. डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय कामगार चळवळीस दिशा देण्याचे महत्वपुर्ण कार्य केले. ब्रिटिश सरकारचे मजुर मंत्री ते स्वतंत्र भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांनी कष्टकरी शेतकरी, शेतमजुर, कामगार कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी धोरणाची  निर्मिती केली. स्वतंत्र भारतात संविधानाने प्रदत्त केलेल्या अधिकारामुळे अनु.जाती-जमाती, इतर मागास वर्ग व अल्पसंख्यांक समुहातुन कामगार, कर्मचारी व अधिकारी वर्गाची निर्मिती झाली. या वर्गात सामाजिक-आर्थिक प्रगती सोबतच अनेक समस्या सुद्धा उद्भवु लागल्या. तर दुसरीकडे असंघटित क्षेत्रातील शोषित-पिडीत वर्गातील  रोजंदारी, ठेकेदारी, बांधकाम कामगार इत्यादी क्षेत्रात कार्यरत कामगारांच्या समस्या वाढीस लागल्या. या सर्वांकडे प्रस्थापित ट्रेड युनियन्स नी अनास्था दाखविली.  या परिस्थितीचा सर्वांगिण विचार करुन फुले - आंबेडकरी चळवळीतील कृतिशील नेते स्मृतीशेष श्रीकृष्ण उबाळे साहेब यांनी दि. 15 सप्टेंबर 1991 रोजी नागपुर मुक्कामी " बहुजन एम्प्लाईज फेडरेशन आॕफ इंडिया " या ट्रेड युनियन ची स्थापना केली. गेल्या 32 वर्षा  पासुन ही युनयन शेतकरी, शेतमजुर, कामगार, कर्मचारी, अधिकारी वर्गात कार्यरत आहे. आज देशात ब्राम्हणशाही व भांडवलशाही पुरस्कृत सरकार आहे.या सरकारने अनेक शेतकरी, कामगार, कर्मचारी अधिकारी वर्गाच्या विरोधात असणारे कायदे आणि निर्णय घेतलेले आहेत. अशा स्थितीत फुले - आंबेडकरी विचारांची शेतकरी, शेतमजुर, कामगार, कर्मचारी अधिकारी वर्गाच्या हिताची संघटित चळवळ उभारणे हि काळाची गरज आहे. ही गरज लक्षात घेता बहुजन एम्प्लाईज फेडरेशन आॕफ इंडियाचे राज्य अधिवेशन विशेष प्रासंगिक ठरते. तेव्हा फुले - आंबेडकरी विचाराच्या शेतकरी, शेतमजुर, कामगार कर्मचारी व अधिकारी वर्गाची संघटित चळवळ गतिमान करण्यासाठी या अधिवेशनास तन-मन-धनाने सहकार्य करावे ही विनंती. 

संकलन :- सिध्दार्थ सुमन, मो. 9923447347

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)