Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

धक्कादायक ! गोंडपिपरीत बंद खोलीत आढळला 26 वर्षीय तलाठ्याचा मृतदेह Shocking! The dead body of 26-year-old Talathi was found in a locked room in Gondpipari

धक्कादायक ! गोंडपिपरीत बंद खोलीत आढळला 26 वर्षीय तलाठ्याचा मृतदेह  Shocking!  The dead body of 26-year-old Talathi was found in a locked room in Gondpipari

गोंडपिपरी :- महसूल प्रशासनाचा व ग्रामविकासाचा महत्वाचा पाया म्हणून तलाठ्याला ओळखलं जाते त्यामुळं गाव पातळीवर तलाठ्याला सन्मान मिळत असला तरी अनेक तलाठ्यावर कामाचा अतिरिक्त ताण असल्याची चर्चा आहे. मात्र आज चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी शहरात एका 26 वर्षीय तलाठ्याच्या बंद खोलीत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना आज शनिवार दिनांक 26 ऑगस्टला दुपारी 1:00 वाजताच्या सुमारास उघडकीस आली याविषयीच्या सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार ओमकार भदाडे वय -26 वर्ष रा. मुळगाव उमरखेड जि. यवतमाळ येथील रहिवासी असलेल्या व सद्यस्थितीत पोंभुर्णा तालुक्यातील पिपरी देशपांडे या गावात कार्यरत असून मागील 2 ते 3 दिवसापासून त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार आपल्या मित्रांकडे केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली असून मित्रांनी योग्य तो उपचार करण्याचा सल्ला ही दिला मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले व हेच दुर्लक्ष जीवावर बेतले की काय अशी परिसरात चर्चा आहे. गोंडपिपरी येथे ते किरायाच्या खोलीत वास्तव्याला होते. शेजाऱ्यांनी भोजनासाठी आवाज दिला असता कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळं अखेर रूचे दार तोडण्यात आले व त्यांचा मृतदेह आढळून आल्याचे दिसून आले. त्यांचा मृतदेह ह्रदयविकाराच्या धक्कयाने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असला तरी घटनेचा पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या