NAAC च्या मूल्यांकनात महाराष्ट्र आघाडीवर महाराष्ट्रातील 1957 उच्च शिक्षण संस्थांनी नॅक मूल्यमापन केले असल्याची माहिती तर कर्नाटक 1028 उच्च शिक्षण संस्थासह दुसऱ्या क्रमांकावर ! (In NAAC's evaluation, Maharashtra is the leader with 1957 higher education institutes in Maharashtra and Karnataka is second with 1028 higher education institutes.)

Vidyanshnewslive
By -
0

NAAC च्या मूल्यांकनात महाराष्ट्र आघाडीवर महाराष्ट्रातील 1957 उच्च शिक्षण संस्थांनी नॅक मूल्यमापन केले तर कर्नाटक 1028 उच्च शिक्षण संस्थासह दुसऱ्या क्रमांकावर असल्याची सूत्रांची माहिती ! (According to sources, Maharashtra is leading in the NAAC assessment with 1957 higher education institutions in Maharashtra doing NAAC assessment while Karnataka is second with 1028 higher education institutions.)

वृत्तसेवा :- (राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाण परिषद) ही शैक्षणिक संस्थांचे मूल्यमापन करणारी संस्था आहे. भारतात NACCची स्थापना वर्ष १९९४ मध्ये करण्यात आली होती. (NAAC Assessment)संस्थांचे मूल्यांकन <१.५० ते ४.०० या CGPA पट्टीत केले जाते. त्यानंतर D ते A++ अशी अक्षरात्मक श्रेणी निश्चित केली जाते. यानुसार शैक्षणिक संस्थेला मान्यता दिली जावी की नाही हे निश्चित करण्यात येते. १.५० पेक्षा कमी CGPA असलेल्या संस्थांना मान्यता दिली जात नाही.. सर्व शैक्षणिक संस्थांसाठी NACCचे मूल्यांकन करून घेणे महत्त्वाचे आहे. आणि उच्च शिक्षण विभागाव्दारे वेळोवेळी या गोष्टींचा पाठपुरावा केला जातो. अनेकवेळा आपल्या शैक्षणिक संस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी खोटं चित्र दाखवले जाते किंवा हे थोडे वेळखाऊ काम असल्यामुळे अनेक संस्था याकडे दुर्लक्ष करतात. उच्च शिक्षणाची पद्धत सुधारावी यासाठी उच्च शिक्षण संस्थांचे वेळोवेळी मूल्यांकन केले जाते. NACC कडून मिळणारे मूल्यांकन आणि मान्यता यावरुन शैक्षणिक संस्थांचा दर्जा ठरत असतो. शैक्षणिक संस्थेची कामगिरी कशी आहे, अभ्यासक्रमाची रचना आणि अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाते, विद्यार्थ्यांचा निकाल, संस्थेद्वारे केले जाणारे संशोधन कार्य, सभासदांचे प्रकाशन, प्रशासन, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुख सुविधा इत्यादी गोष्टींची नोंद घेत शैक्षणिक संस्थेचा दर्जा ठरवला जातो. यावेळी महाराष्ट्रातील अनेक शैक्षणिक संस्था NACC (NAAC) मुल्यांकनात आघाडीवर आहेत. आत्तापर्यंत राज्यातील ३५ विद्यापीठे आणि १,९२२ महाविद्यालये आणि १,९५७ उच्च शिक्षण संस्थांनी NACCचे मूल्यांकन केले आहे. महाराष्ट्रानंतर कर्नाटक मधून‌ १०२८ शिक्षण संस्थांनी NACC चे मूल्यांकन केले आहे तर तिसऱ्या क्रमांकावर तमिळनाडू ९०४ मूल्यांकनांसह आहे. त्याविषयी अधिक माहिती देताना उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर म्हणाले की राज्यातील शिक्षण संस्थांनी NACC चे मूल्यांकन करणे महत्त्वाचे आहे. शासनाद्वारे या गोष्टीचा सतत पाठपुरावा केला जातो. NACCचे नियम न पाळणाऱ्या शैक्षणिक संस्थेचे कार्य रोखण्याचा आदेश देण्यात आला आहे. म्हणूनच राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांनी NACCचे मूल्यांकन करून घेतले असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)