मोहुर्ली निसर्ग पर्यटन गेटच्या सुशोभीकरणच्या वनमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन (Mohurli Nisarga Tourism Gate Beautification Forest Minister Bhoomipujan by Na. Sudhirbhau Mungantiwar)

Vidyanshnewslive
By -
0

मोहुर्ली निसर्ग पर्यटन गेटच्या सुशोभीकरणच्या वनमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन (Mohurli Nisarga Tourism Gate Beautification Forest Minister Bhoomipujan by Na. Sudhirbhau Mungantiwar)



चंद्रपूर :- ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली निसर्ग पर्यटन गेट सुशोभीकरणाचे भूमिपूजन राज्याचे वन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 14 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता मोहर्ली गेट येथे होणार आहे. ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या, व्याघ्र गीताचे (मराठी रूप) लोकार्पण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. या गीताची संकल्पना टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपची असून सदर गीत तनवीर गाजी यांनी लिहिले आहे. तर त्याला शंतनू मोइत्रा यांनी संगीतबद्ध केले आहे. या गीतासाठी छायाचित्रण, प्रसिद्ध दिग्दर्शक नल्ला मुथ्थू यांनी काढले आहे. विशेष म्हणजे या गीताचे सर्व शूटिंग ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात झाल्याचे क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यात जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. या प्रकल्पाला भेट देणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी जवळपास 50 ते 60 टक्के पर्यटक मोहर्ली गेट मधून व्याघ्र सफारीचा आनंद लुटतात. देश - विदेशातील येणाऱ्या पर्यटकांसाठी निसर्गाच्या पर्यटनासोबतच गेटचे सुशोभीकरण असणे आवश्यक आहे. याच उद्देशाने मोहर्ली निसर्ग पर्यटन गेट सुशोभीकरणाचे भूमिपूजन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 14 ऑगस्ट रोजी होत आहे. या सुशोभीकरणाअंतर्गत पर्यटकांसाठी वातानुकूलित प्रतीक्षालय, उपहारगृह, व्याघ्र प्रकल्पाची माहिती देणारे केंद्र, भेटवस्तू विक्री केंद्र, पार्किंग व्यवस्था, तिकीट काउंटर आदींचा समावेश आहे. अशी माहिती मोहुर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी दिली आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)