स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील 954 पोलिसांना पदक जाहीर तर महाराष्ट्रातील 76 पोलिसांना पदक जाहीर On the eve of Independence Day, medals were awarded to 954 policemen across the country and 76 policemen in Maharashtra

Vidyanshnewslive
By -
0

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील 954 पोलिसांना पदक जाहीर तर महाराष्ट्रातील 76 पोलिसांना पदक जाहीर On the eve of Independence Day, medals were awarded to 954 policemen across the country and 76 policemen in Maharashtra

वृत्तसेवा :- पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके जाहीर केली जातात. राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक' आणि 'पोलीस शौर्य पदक', जीवन आणि मालमत्ता यांचे संरक्षण, गुन्हेगारीला पायबंद आणि गुन्हेगारांना अटक करण्यासाठी उल्लेखनीय शौर्यासाठी दिले जाते. विशिष्ट सेवेसाठी 'राष्ट्रपती पोलीस पदक' पोलीस सेवेतील खास उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाते. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 'पोलीस पदक' संसाधन आणि कर्तव्यनिष्ठेने बजावलेल्या अमूल्य सेवेसाठी प्रदान केले जाते. वर्ष २०२३ च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील एकूण ९५४ पोलिसांना 'पोलीस पदके' जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ७६ पोलिसांना समावेश आहे. राज्यातील प्रवीण सांळुके, विनय कुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे या पोलिस अधिकाऱ्यांना विश‍िष्ट सेवेसाठी 'राष्ट्रपती पोलीस पदक' आज जाहीर करण्यात आली. यासह राज्यातील ३३ पोलिसांना 'पोलीस शौर्य पदक' तर ४० पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 'पोलीस पदक' असे राज्यातील एकूण ७६ पोलिसांना पदके जाहीर कण्यात आली आहे. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 'पोलीस पदक' राज्यातल्या ४० पोलिसांना जाहीर झाले आहे. यामध्ये प्रवीणकुमार पडवळ (पोलीस सहआयुक्त, मुंबई शहर), विजय पाटील (पोलीस उप महानिरीक्षक, एसीबी, मुंबई), राजेश वाघ, अरुण सावंत, बाळकृष्ण हनपुडे पाटील, अधिकराव पोळ, माया मोरे, आनंद वाघ, संजू जॉन, सुभाष दूधगावकर, तन्वीर शेख, मनीषा नलावडे, विकास घोडके, अनिल काटके, व्यंकटेश पलकुर्ती, वलू लाभाडे, अरुणकुमार सपकाळ, संजय जाधव, उमर शेख, रविकांत कदम, प्रदीप तांगडे, द्वारकादास चिखलीकर, चंद्रकांत साळुंके, दिनेश म्हात्रे, मोहम्मद अस्लम शेख हमीद शेख, सुनील नवार, संजय माळी, अंबादास हुलगे, शामराव गडाख, मोहन डोंगरे, नागनाथ फुटाणे, विजय आवकीरकर, भानुदास पवार, अशोक लांडे, भास्कर कदम, गुरुनाथ गोसावी, जगदीश भुजाडे, विजय बाविस्कर, कैलास नागरे आणि महादेव पाटील यांचा समावेश आहे. सविस्तर यादीचा तपशील www.mha.gov.in आणि https://awards.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती, जयंत नाईकनवरे यांचा समावेश आहे. राज्यातल्या ३३ पोलिसांना 'पोलीस शौर्य पदक' जाहीर झाले आहे. पोलीस शौर्य पदकांमध्ये रोहित फार्णे, बाळासाहेब जाधव, सतीश पाटील,भास्कर कांबळे, कृष्णा काटे, द्रुग्साय आसाराम नरोटे, सुरपत वड्डे, संजय वाचामी, गौतम कांबळे, मोरेश्वर पुरम, मसरू कोरेटी, मुकेश उसेंडी, विनोद डोकरमारे,कमलाकर घोडाम, चंद्रकांत उके, महारु कुळमेथे, पोडा अत्राम, दयाराम वाळवे, प्रवीण झोडे, देविदास हलामी, दीपक मडावी, रामलाल कोरेटी, हेमंत कोडप, किरण हिचामी, वारलू अत्राम, माधव तिम्मा, नरेश सिदाम, रोहिदास कुसनाके, मुकिंद राठोड, नितेश दाणे, नागेश पाल, कैलाश कुळमेथे, प्रशांत बिटपल्लीवार यांचा समावेश आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)