राजुरा-सास्ती मार्गावर ट्रकने व 2 दुचाकींचा भीषण अपघात पती-पत्नीसह मुलगी जागीच ठार तर 2 गंभीर जखमी असल्याचं वृत्त (A terrible accident involving a truck and 2 bikes on the Rajura-Sasti road left husband and wife dead on the spot and 2 seriously injured.)

Vidyanshnewslive
By -
0

राजुरा-सास्ती मार्गावर ट्रकने व 2 दुचाकींचा भीषण अपघात पती-पत्नीसह मुलगी जागीच ठार तर 2 गंभीर जखमी असल्याचं वृत्त (A terrible accident involving a truck and 2 bikes on the Rajura-Sasti road left husband and wife dead on the spot and 2 seriously injured.)

राजुरा - : राजुरा-सास्ती मार्गावर जव्हेरी पेट्रोल पंप जवळ कोळशाने भरलेल्या एका ट्रक ने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत पती-पत्नी व मुलगी घटनास्थळी मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. याविषयीच्या अधिक माहिती नुसार राजुरा येथील निवासी असलेले व धोपटाला येथे जात असलेले निलेश वैद्य, वय - 35 वर्ष, रुपाली निलेश वैद्य - 30 वर्ष व कु. राही निलेश वैद्य, वय - 3 वर्ष यांचा आज सायंकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान जव्हेरी पेट्रोल पंप जवळ भीषण अपघात झाला व या तिघांचाही जागींच मृत्यू झाला तर याच अपघातग्रस्त ट्रकने पुढे जाऊन पुन्हा एका दुचाकीला धडक दिली असून या अपघातात 2 व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचं वृत्त असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. सदर अपघात रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झाल्याची चर्चा असून रस्त्यावर असणाऱ्या धुळीमूळ समोरचे दिसेनासे होते व दुचाकी वाहनावरील नियंत्रण सूटतात यामुळं अपघाताची शक्यता नाकारता येत नाही शिवाय या स्थितीत ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत असून वाहन चालवत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून या अपघाताची माहिती राजुरा पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले असून तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणी साठी राजुरा येथील रुग्णालयात पाठविले असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)