इस्लाम आपल्या प्रत्येक अनुयायांकडून खऱ्या देशभक्तीची अपेक्षा करतो (Islam expects true patriotism from each of its followers)

Vidyanshnewslive
By -
0

इस्लाम आपल्या प्रत्येक अनुयायांकडून खऱ्या देशभक्तीची अपेक्षा करतो (Islam expects true patriotism from each of its followers)


स्वातंत्र्य दिन विशेष 

बल्लारपूर :- आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत. सर्व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून हा विशेष दिवस मोठ्या आनंदाने आणि कृतज्ञतेच्या भावनेने साजरा करत आहेत. या विशेष प्रसंगी, अहमदिया मुस्लिम जमाअत चन्द्रपूर देशातील सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा देते. या पवित्र प्रसंगी आम्ही त्या सर्व देशभक्तांचे स्मरण करतो जे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले आणि त्यांच्या बलिदानाकडे आदराने पाहतो. ज्यांनी आपल्या पिढ्यांना स्वातंत्र्याच्या वातावरणात श्वास घेता यावा म्हणून आपल्या प्राणांची आहुती दिली. भारत हा लोकशाही देश आहे. या देशातील प्रत्येक नागरिक या देशाच्या विकासात समान भागीदार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त, हे आपल्याला आठवण करून देते की आपल्या स्वतःच्या देशाबद्दल आणि या देशातील लोकांप्रती आपली काही कर्तव्ये आहेत.

       आंतरराष्ट्रीय अहमदिया मुस्लिम जमाअतचे संस्थापक, हजरत मिर्झा गुलाम अहमद कादियानी यांनी "पैग़ाम-ए-सुलह(मैत्री संदेश)" या अविस्मरणीय पुस्तकात आपल्या देशवासियांना परस्पर सहानुभूतीचा सल्ला देताना वर्णन करतात :-  "हे माझ्या देशबांधवांनो! तो धर्म, धर्म नाही, ज्यामध्ये सार्वजनिक सहानुभूतीचे शिक्षण नाही, किंवा तो माणूस, माणूस नाही, ज्यामध्ये सहानुभूतीची भावना नाही. आमच्या परमेश्वराने  कोणत्याही लोकांमध्ये भेदभाव केला नाही. उदाहरणार्थ, आर्यावर्तातील प्राचीन राष्ट्रांना जे काही मानवाधिकार बहाल करण्यात आले होते, तेच सर्व अधिकार अरब, पर्शियन, शामी, चिनी, जापानी, युरोपियन आणि अमेरिकन राष्ट्रांना देखील बहाल करण्यात आले आहेत. कारण परमेश्वराची पृथ्वी सर्वांसाठी समान अंथरूण आहे तसेच सूर्य, चंद्र आणि इतर नक्षत्रे सर्वांना समान प्रकाश देतात आणि इतर सेवा देखील बजावत आहेत. त्याने निर्माण केलेले घटक म्हणजे हवा, पाणी, अग्नी आणि माती आणि त्याच प्रकारे त्याने निर्माण केलेल्या सर्व वस्तू, धान्य, फळे आणि औषधे इ. पासून प्रत्येक जण लाभ घेत आहेत. म्हणून या ईश्वरीय व्यवहारापासून आम्हाला असा धडा मिळतो की, आम्ही माणवजातीशी कृपण आणि  संकुचित वृत्तीने वागू  नयेत तर प्रत्येक व्यक्तीशी प्रेम आणि सहानुभूतीने वागवेत. अहमदिया मुस्लिम जमाअतचे जागतिक प्रमुख, हज़रत मिर्झा मसरूर अहमद साहब, देशभक्तीच्या संदर्भात म्हणतात प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी असे उपदेश केले की, "देशभक्ती हा श्रध्देचा अविभाज्य भाग आहे." म्हणून इस्लाम आपल्या प्रत्येक अनुयायांकडून खऱ्या देशभक्तीची अपेक्षा  करतो. त्यामुळे ईश्वर आणि इस्लामवर खरे प्रेम करायचे असेल तर त्याने आपल्या देशावर प्रेम करणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की एखाद्या व्यक्तीचे परमेश्वरावरील प्रेम आणि देशप्रेम यांच्यात संघर्ष असू शकत नाही. म्हणून मुस्लिमाने आपल्या देशाप्रती निष्ठेचे उच्च दर्जे प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण ते ईश्वराला प्राप्त करण्याचे आणि त्याच्या जवळ येण्याचे एक साधन आहे. म्हणून, खर्‍या मुस्लिमासाठी त्याचे  परमेश्वरावरील प्रेम आणि त्याच्या देशावरील निष्ठा यांच्यामध्ये कधीही अडथळा बनणे अशक्य आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की एखाद्या व्यक्तीचे परमेश्वरावरील प्रेम आणि देशप्रेम यांच्यात संघर्ष असू शकत नाही. म्हणून मुस्लिमाने आपल्या देशाप्रती निष्ठेचे उच्च दर्जे प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण ते ईश्वराला प्राप्त करण्याचे आणि त्याच्या जवळ येण्याचे एक साधन आहे. म्हणून, खर्‍या मुस्लिमासाठी त्याचे देवावरील प्रेम आणि त्याच्या देशावरील निष्ठा यांच्यामध्ये कधीही अडथळा बनणे अशक्य आहे.

संकलन :- अनसार अली ख़ान, बि.टी.एस प्लॉट, शिवाजी वार्ड बल्लारपुर

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज ), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)