महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा, महाविद्यालयातील 3 अग्निविरांचा सत्कार (Mahatma Jyotiba Phule College celebrates 76th anniversary of independence with enthusiasm, 3 Agni Virats of college are felicitated)

Vidyanshnewslive
By -
0

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा, महाविद्यालयातील 3  अग्निविरांचा सत्कार (Mahatma Jyotiba Phule College celebrates 76th anniversary of independence with enthusiasm, 3 Agni Virats of college are felicitated)

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे प्र-प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विचारपीठावर महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संजयभाऊ कायरकर, उपाध्यक्ष राजेश चिताडे, माजी प्राचार्य डॉ. प्रभात दुबे, प्रा.डॉ.बालमुकुंद कायरकर, प्रा. ले.योगेश टेकाडे ई ची उपस्थिती होती. तदनंतर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व एनसीसी कॅडेट आशिष भोयर, चेतन थेरे व कुणाल डांगे हे भारतीय सैन्याच्या विविध विभागात अग्निविर म्हणून सेवा देत असून यानिमित्ताने मान्यवर अतिथींच्या हस्ते या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. सोबतच क्रीडा शाखेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.



      यावेळी मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बादलशाह चव्हाण म्हणालेत की, " देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणारे प्रत्येक क्रांतिकारी असो किंवा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क असून तो मी मिळविणारच अशा प्रकारची घोषणा देणारे लोकमान्य टिळक, चले जावं तसेच मिठाच्या सत्याग्रहाच्या माध्यमातून जनतेत एकता निर्माण करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी, मी प्रथम भारतीय व अंतिम भारतीय अशी घोषणा देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्व तमाम महापुरुषांना वंदन करून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात या कार्यक्रमाचं संचालन प्रा. ले. योगेश टेकाडे तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. बालमुकुंद कायरकर यांनी केले यावेळी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.


संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)