बल्लारपुर न.प. मार्फत रस्त्यावरील मोकाट /बेवारस जनावरे पकडण्याची धडक मोहीम सुरु (Ballarpur N.P. Launched a campaign to catch stray/deserted animals from the streets)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपुर न.प. मार्फत रस्त्यावरील मोकाट /बेवारस जनावरे पकडण्याची धडक मोहीम सुरु (Ballarpur N.P.  Launched a campaign to catch stray/deserted animals from the streets)

बल्लारपूर :-बल्लारपुर शहरातील मुख्य रस्ता, जुने बस स्थानक, रेल्वे चौक, काटागेट या परिसरामध्ये मागिल काही दिवसांपासुन मोकाट/बेवारस जनावरे रस्त्याच्या मधोमध बसुन असतात त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन अपघात घडण्याची शक्यता लक्षात घेता बल्लारपुर नगर परिषदे मार्फत संपुर्ण शहरामध्ये जाहीर मुनादी व्दारे मोकाट/बेवारस जनावरे पकडण्या संबंधीची सुचना प्रसिध्द करुन दिनांक १३/०८/२०२३ ला नगर परिषदे व्दारे प्रत्यक्ष जनावरे पकडणे संबंधीची मोहीम सुरू असुन सदर मोहीमे अंतर्गत आजपावेतो ४८ जनावरे पकडुन गौशाला चंद्रपूर येथे पाठविण्याची कार्यवाही नगर परिषद प्रशासना मार्फत करण्यात आलेली आहे. काही जनावरे मालकांनी आपली जनावरे कांजी हाउस येथून सोडविलेली आहे. यापूढे शहरामधिल मोकाट/बेवारस जनावरे पकडणे संबंधीची मोहिम दिवस व रात्री दोन्ही पाळीत करण्यात येणार असुन जनावरे मालकांनी आपली जनावरे दिवसा/रात्री रस्त्यांवर फिरणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. बल्लारपुर शहरामधिल रस्त्यावर फिरणारे मोकाट/बेवारस जनावरांचे मालकास मा. प्रशासक तथा मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपुर यांच्या वतीने सुचीत करण्यात येते की, त्यांनी रस्त्यावर फिरणारी आपली जनावरे घरी बांधुन ठेवावी. अन्यथा मोहिमे दरम्यान पकडण्यात आलेली जनावरे सोडविणे करीता नगर परिषद प्रशासन व पोलिस प्रशासन यांचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील. त्याचप्रमाणे संबंधीत मोकाट/बेवारस जनावरांचे मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. याबाबत गंभिरतेने नोंद घ्यावी असे आवाहन श्री विशाल वाघ प्रशासक तथा मुख्याधिकारी नगरपरिषद, बल्लारपूर यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)