महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात पार पडले मतदार नोंदणी शिबीर, अनेक विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव नोंदविले (A voter registration camp was conducted in Mahatma Jyotiba Phule college, many students registered their name in the voter list)

Vidyanshnewslive
By -
0

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात पार पडले मतदार नोंदणी शिबीर, अनेक विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव नोंदविले (A voter registration camp was conducted in Mahatma Jyotiba Phule college, many students registered their name in the voter list)


बल्लारपूर :- देशाचं भविष्य म्हणजे युवा मतदार जे आपल्या मतदानाच्या माध्यमातून या देशाच्या वर्तमानासह भविष्य सुध्दा घडवू शकतात. याविषयीच्या जनजागृती साठी बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात इतिहास व राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त माध्यमातून दोन दिवसीय मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नगर परिषद बल्लारपूर व तहसील कार्यालय बल्लारपूरच्या निवडणूक विभागाच्या सहकार्यातून व मा. महेंद्र फुलझेले, नायब तहसीलदार बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी शिबीराचे 23 ते 24 ऑगस्ट 2023 या दोन दिवसीय शिबिरात महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव नोंदणी साठी अर्ज दाखल केला असून याकरिता निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. यावेळी मा. महेंद्र फुलझेले, नायब तहसीलदार बल्लारपूर, मा. लखनसिह चंदेल, माजी नगराध्यक्ष बल्लारपूर, श्री. सुनिल तुंगीडवार, श्री दिलीप आत्राम  प्रा. डॉ. बादलशाह  चव्हाण, प्राचार्य  महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर, प्रा.डॉ. विनय कवाडे, प्रा.डॉ. किशोर चौरे, प्रा.डॉ.रोशन फुलकर, प्रा.डॉ. पल्लवी जुनघरे, प्रा.डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा.डॉ. पंकज कावरे, प्रा.डॉ. रजत मंडल, प्रा. सतिश कर्नासे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. ले. योगेश टेकाडे प्रा. शुभांगी भेंडे(शर्मा), प्रा. रोशन  साखरकर, प्रा. दिवाकर मोहितकर, प्रा. सविता पवार,  प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. दिपक भगत, प्रा. श्रध्दा कवाडे, प्रा. विभावरी नखाते, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. राजेंद्रकुमार साखरे, ई ची उपस्थिती होती. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)