चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प शिबिराचे आयोजन (Organized License Camp Camp by Chandrapur Sub Regional Transport Office)
चंद्रपूर :- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार देण्यात येणार आहेत. तरी, जिल्ह्यातील नागरिकांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे. 25 ऑगस्ट रोजी आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा, 28 ऑगस्ट रोजी एन. एच. महाविद्यालय ब्रह्मपुरी, 29 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह चिमूर, 30 ऑगस्ट रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदूर तर 31 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह, गोंडपिपरी या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याच्या 22 तारखेला दुपारी 1 वाजता शिबिराचे ऑनलाईन अपॉइंटमेंट कार्यालयामार्फत खुले करण्यात येईल याची जिल्ह्यातील नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या