राज्यातील 75 हजार पदाची नौकरभरतीने सरकार झाले कोट्यधीश, तलाठीच्या मेगा भर्ती नंतर जिल्हा परिषदेच्या पद भर्तीतुन शासकीय तिजोरीत जमा झाले तब्बल 145 कोटी रु जमा ! 75,000 posts in the state became the government by recruiting millionaires, after the mega recruitment of Talathi, as many as 145 crore rupees have accumulated in the government treasury from the recruitment of Zilla Parishad posts

Vidyanshnewslive
By -
0

वृत्तसेवा :- राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये १९ हजार ४६० पदांची नोकरभरती होणार आहे. त्यासाठी तब्बल ४१ लाख ५१ हजार उमेदवारांनी अर्ज केले असून एका जागेसाठी सरासरी ७५ उमेदवार स्पर्धेत आहेत. उमेदवारांच्या अर्जातून सरकारच्या तिजोरीत १४५ कोटी रुपये जमा झाले आहेत. ५ ते २५ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. अर्जांची छाननी होऊन परीक्षा पार पडतील. उमेदवारांची संख्या पाहता एक-दोन दिवसात परीक्षा पार पाडणे अशक्य असल्याने किमान आठ दिवसांत वेगवेगळ्या टप्प्यांवर जिल्हा परिषदांसाठी अर्ज केलेल्या उमदेवारांची परीक्षा घेतली जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शिंदे-फडणवीस सरकारने शासकीय विभागांमधील ७५ हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू असून आता जिल्हा परिषदांमधील रिक्तपदांसाठी अर्ज मागविले आहेत. खासगी क्षेत्रातील नोकरीपेक्षा शासकीय नोकरीत सुरक्षिततेची हमी आहे. त्यामुळे त्याठिकाणी पगाराची व नोकरीची शाश्वती असल्याने जिल्हा परिषदांमधील गट-क व गट-ड संवर्गातील पदांसाठी बारावी उत्तीर्णची अट असतानाही पदवी, पदव्युत्तर पदवी व अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले आहेत. तलाठी, पोलिस भरतीवेळी देखील अशी वस्तुस्थिती समोर आली होती. विशेष बाब म्हणजे जिल्हा परिषदांमधील पदभरतीसाठी अवघ्या २० दिवसांत तब्बल साडेचौदा लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तत्पूर्वी, राज्यात सुशिक्षित बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढल्याची वस्तुस्थिती तलाठी भरतीनंतर आता जिल्हा परिषदांच्या भरतीत देखील समोर आली आहे. एका ठिकाणी अपयश आल्यानंतर तोच उमेदवार पुन्हा दुसऱ्या पदासाठी अर्ज करतोय, असे चित्र आहे. त्यामुळे एका उमेदवाराला आठ ते दहा हजार रुपयांचे नुसते अर्जाचे शुल्कच भरावे लागणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)