पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय ? चोरीच्या संशयावरून 3 तरुणांना चक्क झाडाला उलट लटकवून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना ! What is going on in progressive Maharashtra? A shocking incident of brutally beating 3 youths by hanging them upside down from a tree on suspicion of theft !

Vidyanshnewslive
By -
0

पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय ? कबुतर चोरीच्या संशयावरून 3 तरुणांना चक्क झाडाला उलट लटकवून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना ! What is going on in progressive Maharashtra?  A shocking incident of brutally beating 3 youths by hanging them upside down from a tree on suspicion of theft !

वृत्तसेवा :- फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय चक्क चोरीच्या संशयावरून 3 तरुणांना झाडाला उलट लटकवून मारहाण केल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती असून अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली असून एका तरूणाना झाडाला बांधून त्याच्यासोबत अमानुष कृत्य करण्यात आले आहे. शेळी चोरीच्या संशयातून ही घटना घडली असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे ही घटना घडली आहे. अधिक माहितीनुसार, शेळी आणि कबुतर चोरल्याचा संशय या दलित तरूणांवर होता. त्यानंतर त्यांना घरातून उचलून नेत झाडाला उलटं लटकावून त्यांच्यासोबत अमानुष कृत्य करण्यात आल्याची माहीती पीडितांच्या कुटुंबियांनी दिली आहे. मारहाणीमध्ये 3 तरूण जबर जखमी झाले असल्याची माहिती असून त्यांना शिरापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दरम्यान, याप्रकरणी दलित संघटनांनी आवाज उठवायला सुरूवात केली असून आरोपींचा तपास पोलिस घेत आहेत. तर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये तरूणांना झाडाला उलटं लटकावलेलं दिसत आहे. या घटनेनंतर अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होणार असून याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)