गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी सुट्टीत 10 दिवसांची वाढ, आता नवीन सत्र 26 जून 2023 पासून सुरु होणार (Gondwana University summer vacation extended by 10 days, now new session to start from 26th June 2023)

Vidyanshnewslive
By -
0

गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी सुट्टीत 10 दिवसांची वाढ, आता नवीन सत्र 26 जून 2023 पासून सुरु होणार (Gondwana University summer vacation extended by 10 days, now new session to start from 26th June 2023)

गडचिरोली :- चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही आदिवासी जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं विभाजन करून गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली  सद्यस्थितीत 2022-23 या शैक्षणिक सत्रातील उन्हाळी सुट्टी बाबत अंशतः बदल करण्यात आला आहे विशेष म्हणजे उन्हाळी सुट्टीत 10 दिवसांची वाढ करण्यात आली आहे या संदर्भात गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने एक अधिसूचना जारी करण्यात आली असून यानुसार विद्यापीठाशी संलग्नित असलेली सर्व महाविद्यालय व विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक विभागाच्या शिक्षकाच्या उन्हाळी सुट्टया दि. 15 जून 2023 ते 24 जून 2023 पर्यंत वाढविण्यात आल्या असून पुढील नवीन शैक्षणिक सत्र 26 जून 2023 पासून सुरु होईल अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने अधिसूचने द्वारे देण्यात आली आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)