बल्लारशाह रेल्वे स्थानकावर मालगाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू, मृतक मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातील असल्याची माहिती (One person died in the collision of a goods train at Ballarshah railway station, the deceased is from Satna district of Madhya Pradesh.)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारशाह रेल्वे स्थानकावर मालगाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू, मृतक मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातील  असल्याची माहिती (One person died in the collision of a goods train at Ballarshah railway station, the deceased is from Satna district of Madhya Pradesh.)

बल्लारपूर :- मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व रेल्वे व दक्षिण रेल्वेचं एक महत्वाचं जंक्शन म्हणून बल्लारशाह रेल्वे स्थानक ओळखलं जात मात्र मागील काही काळात बल्लारशाह रेल्वे स्थानक चर्चेत आहे मग तो फूट ओव्हर ब्रिज चा विषय असो की बल्लारपूर-पुणे, बल्लारपूर-मुंबई रेल्वेची मागणी असो तसेच कोरोना संक्रमण काळात जिल्ह्यातील  हक्काची असलेली सेवाग्राम एक्सप्रेस ती अजूनही बंद अवस्थेत आहे. नुकतीच काही महिन्यापूर्वी बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिज कोसळून 1 महिला ठार झाली तसेच 12 व्यक्ती जखमी झाल्याची घटना घडली होती. आज सकाळी पुन्हा एकदा बल्लारशाह रेल्वे स्थानकावर अपघात घडला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार आज 14 जून ला सकाळच्या 6:00 वाजताच्या दरम्यान एक अपघात झाला असून मालगाडीच्या धडकेत विनोद नामक व्यक्ती जो मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती असून त्याने फलाट क्रमांक 3 वरून जाणाऱ्या मालगाडी समोर उडी घेतली या घटनेत इसमाचा मृत्यू झाला धडक इतकी जोरदार होती की प्रवाशाच्या शरीराचे दोन तुकडे झाल्याची चर्चा आहे प्राथमिक माहितीनुसार मृतक हा मध्यप्रदेशातील सतना येथील असून आधार कार्ड च्या द्वारे ओळख पटली असून सद्यस्थितीत त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रेल्वे पोलीस चे तेलमोरे (हेड कॉन्स्टेबल) व चौधरी (शिपाई) करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)