भद्रावती येथील हत्या प्रकरणातील आरोपीला १९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी, आणखी काही नवीन माहिती उघडकीस येण्याची शक्यता !

Vidyanshnewslive
By -
0

भद्रावती येथील हत्या प्रकरणातील आरोपीला १९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी, आणखी काही नवीन माहिती उघडकीस येण्याची शक्यता !

भद्रावती :- आठवडा भरापूर्वी भद्रावती शहरात दि ४ एप्रिल ला ढोरवासा - तेलवासा रस्त्याजवळ शासकीय आयटीआय समोर २५ वर्षीय तरुणी शेतात विवस्त्र शिरच्छेद केलेला मृतदेह सापडला प्रकरणातील फरार आरोपीला बल्लारपूर येथून पोलिसांनी सापळा रचून अटक केले आहे. या प्रकरणी मृतकच्या मैत्रिणीने आपल्या मित्रा सोबत एकत्र हत्येचा कट रचला आणि ४ एप्रिल रोजी रात्री मोटारसायकल वर बसवून मृतकला अज्ञात ठिकाणी नेऊन तिला खाली पाडून तिच्या मांडीवर चाकूने हल्ला केला. नंतर तिच्या पोटावर बसून तिचा गळा दाबला आणि ठार मारला. इतकेच नाही तर मृतदेहाचा शिरच्छेद करण्यात आला व शिरच्छेद करून मृतदेहाचा कपडे काडून डांगळे यांच्या शेतात टाकून सर्व पुरावे नष्ट केले ते पळून गेले होते.या प्रकरणात मृताच्या अल्पवयीन मैत्रीणला अटक करण्यात आली. खूना मध्ये शामिल तरुण फरार झाला होता. सायबर सेल आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे,सहायक निरीक्षक जीतेंद्र बोबडे आणी त्यांच्या पथकाने बल्लारपूर रेल्वे स्थानकावर सापळा रचून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला अटक करण्यात आली. आरोपीचे नाव भद्रावती रहिवासी शंकर शेखर कुरवान (२६)आहे. तो सोमवारी रात्री बल्लारपूर रेल्वे स्थानकावर दुचाकी पार्क करून केरळला पळून जाण्याची तयारी करत होता. आरोपी ला अटक करुन भद्रावती पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आणिआरोपी ने गुन्हा केल्याचे कबूल केले .भद्रावती पोलिसांनी आरोपिला कोर्टात हजर केले असता कोर्टाने १९ तारखे पर्यंत पोलिस कोठडी PCR सुनावली. कलम ३०२,२०१,३४ अंतर्गतभद्रावती पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे साहेब, अप्पर पोलिसअधीक्षक अतुल कुलकर्णी, सायबर सेल , स्थानिक गुन्हे शाखेचेच्या मार्गदर्शनात थानेदार गोपाल भारती यांची टीम या गुन्ह्यात आणखी किती आरोपी आहेत याचा शोध घेत आहेत. पुढील तपास ठाणेदार गोपाल भारती यांच्या मार्गदर्शन मध्ये एपीआय सुधीर वर्मा, एपीआय मसके ,एपीआय मुळे करीत आहेत. या संदर्भातील विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार भद्रावती आणि कॅम्पस मधील लोक दोन्ही मुलींना चांगल्या प्रकारे ओळखल्याबद्दल बोलत आहेत. मुलींच्या प्रोफेशनचीही चर्चा आहे. मात्र पोलिसांनी पत्रकारांची दिशाभूल करणारी विधाने का केली, पोलिसांना सत्य का लपवायचे आहे, अशा प्रकारची चर्चा लोकांमध्ये सुरू आहे. हत्येचे ठिकाण अद्याप उघड झालेले नाही. मुली कुठे राहायच्या, काय करायच्या, हे सांगितले नाही. हत्येचे कारण अपशब्द म्हणून देण्यात आले असून ते चुकीचे असल्याचे बोलले जात आहे. पोलीस काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करत असल्याचे खरे कारण पोलिसांना सापडले नाही किंवा समजू शकले नाही पलीकडे आहे. एकूणच भद्रावती येथील खून प्रकरणात आणखी कोणती माहिती उघड होईल हे पाहणे औसुत्याचे ठरेल.









संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)