डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला सार्वजनिक सुट्टी शैक्षणिक विभाग कार्यक्रम कसा घेणार? शिक्षण विभागाच्या परिपत्रकाने शाळांमध्ये संभ्रम निर्माण
वृत्तसेवा :- १४ एप्रिल रोजी 'विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त पहिली ते बारावीचे विद्यार्थी, अध्यापक महाविद्यालये तसेच शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांसाठी विविध स्पर्धात्मक कार्यक्रम घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने जारी केल्या, मात्र या सूचनांमुळे शाळांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. १४ एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सुट्टी असल्याने शाळा बंद आहेत, तर काही शाळांमध्ये वार्षिक परीक्षा संपल्याने उन्हाळी सुट्टी सुरू झाली आहे. त्यामुळे शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन कसे करणार, असा प्रश्न आता मुख्याध्यापकांसमोर उपस्थित झाला आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, एकपात्री अभिनय, चित्रकर्ला, निबंध, कविता, काव्यवाचन, पोस्टरनिर्मिती आणि रांगोळी स्पर्धा, व्हिडीओ निर्मिती, दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह, एकांकिका, कथाकथन स्पर्धा आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सदर कार्यक्रमाच्या सादरीकरणाचा व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य समाज संपर्क माध्यमावर (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम) #muknayak Ùee HASHTAG (#) चा वापर करून अपलोड करण्याच्या तसेच सदर पोस्टची लिंक https://scertmaha.ac.in/competitions/ येथे शेअर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, मात्र या दिवशी शाळांना सुट्टी असल्याने हे कार्यक्रम ऑनलाइन घ्यायचे की विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून घ्यायचे याविषयी शालेय शिक्षण विभागाकडून कोणत्याही सूचना शाळांना मिळालेल्या नाहीत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068











टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या