महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव शांततामय वातावरणात साजरे करण्याचे चंद्रपूर पोलिसांचे आवाहन !
चंद्रपूर :- १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिवस, दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात सदर उत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. चंद्रपूर जिल्हयात १४ एप्रिल २०२२ रोजी महामानव परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. मागील दोन वर्षात संपूर्ण राज्यात कोरोना विषाणुचे सावट असल्याने अत्यंत साध्या पध्दतीने शासनाचे दिशा निर्देशानुसार सदरची जयंती घरोघरी साजरी करण्यात आली होती. कोरोना निर्बंध हटविल्यामुळे यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती असल्याने धुमधडाक्यात व मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्हयात लहान मोठया एकुण ३८६ मिरवणूका निधण्याची शक्यता असून, इतर बौध्द विहाराचे ठिकाणी सकाळी व सायंकाळी प्रतिमापूजन, वंदना व विविध कार्यक्रम साजरे होत असतात. याच उत्सवा दरम्यान १४ एप्रिल २०२२ रोजी भगवान महावीर जयंती असल्याने जैन बांधवांतर्फे जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे महावीर जयंती निमित्त जिल्हयात ७ ठिकाणी शोभायात्रा/मिरवणूकीचे आयोजन केलेले आहे. सदर दोन्ही सण/उत्सव शांततेत साजरे व्हावे व जिल्हयात कोणतीही समाज विघातक, अनुचित घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता चंद्रपूर पोलीस दलाकडून पोलीस अधिक्षक अरविंद साळवे व अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात ६ उपविभागीय पोलीस अधिकारी,११६ पोलीस अधिकारी व ११४८ पोलीस अंगलदार व ४ विशेष पथके, तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे २ प्लाटून व ५०० गृहरक्षक दलाचे कर्मचारी बंदोबस्ताकरीता नेमण्यात येणार आहे. उपरोक्त सण/उत्सव दरम्यान सोशल मिडीयावर प्रसारीत होणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट व बातम्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्याकरीता सायबर ठाणे चंद्रपूर तर्फे जिल्हयात संपुर्ण सोशल मिडियावर लक्ष ठेवणार आहे. जनतेने सोशल मिडीयावर प्रसारीत होणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांततामय वातावरणात जयंती उत्सव साजरे करावे असे आवाहन चंद्रपूर पोलीस दलातर्फे पोलीस अधिक्षक अरविंद साळवे व अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी केलेले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068












टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या