नागपूरच्या दीक्षाभूमीवरील महामानवाचा पुतळा देतोय ५९ वर्षांपासून ऊर्जा व प्रेरणा
नागपुरातील लष्करीबागेत घडला विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा@५९
बलष्करीबागेतील हाडके भवनात पुतळ्याची निर्मिती बाबासाहेब यांचा पुतळा बनविण्यासाठी लष्करीबागेतील 'हाडके भवन' येथील जागेची निवड करण्यात आली. पराये यांना जेव्हा वेळ मिळत असे तेव्हा ते बाबासाहेबांचा पुतळा बनवू लागले. बाबासाहेबांचा पुतळा बनण्यास सुरुवात झाली तेव्हा अनुयायांची गर्दी व्हायची. पुतळा जेव्हा पूर्णत्वास आला तेव्हा लोकांच्या झुंडीच्या झुंडी हाडके भवनाकडे धाव घेत होत्या. पुतळ्याला सिमेंट लावलेले पाहून मूर्तिकार ढसाढसा रडले पुतळ्याला पाहण्यासाठी येणाऱ्यांमध्ये काही कार्यकर्ते म्हणायचे बाबासाहेबांचा गाल मोठा वाटतो. काही म्हणायचे कान मोठे वाटतात. धोंडबाजी मेढे गुरुजी (कारागीर) यांनी बाबासाहेबांच्या गालाला सिमेंट लावले. अर्ध्या-पाऊण तासाने मूर्तिकार पराये आले. गालाला सिमेंट माखलेले पाहून ते फारच नाराज झाले आणि ढसाढसा रडू लागले. तेथे उपस्थित बाबू आवळे यांनी त्यांची माफी मागितली. पराये यांनी बाबूंच्या शब्दाला मान देऊन पुनश्च नव्या जोमाने पुतळा बनविण्यास लागले. पॉलिश कागदाने पुतळ्याच्या गालाला लागलेले सिमेंटचे कण न् कण मोठ्या परिश्रमपूर्वक पुसून काढले. लष्करीबागेतून पुतळ्याची विशाल मिरवणूक निघाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी, ६ डिसेंबर १९६३ रोजी पुतळ्याचा अनावरणाचा दिवस ठरला. दुपारी २ वाजता बाबासाहेबांच्या साडेपाच फूट उंचीच्या भव्य व आकर्षक अर्धपुतळ्याची विशाल मिरवणूक लष्करीबागेतून कर्मवीर दादासाहेब गायकवाड व रावबहादूर एन. शिवराज यांच्या उपस्थितीत बाबू आवळे यांच्या नेतृत्वात निघाली. सायंकाळी मेणबत्तीच्या प्रकाशात दीक्षाभूमीवर मिरवणूक पोहोचली. बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याकरिता लाखो अनुयायी आले होते. दोन फूट उंचीच्या चबुतऱ्यावर बाबासाहेबांचा पुतळा क्रेनच्या सहाय्याने बसविण्यात आला. त्यानंतर रावबहादूर एन. शिवराज यांनी विजेचे बटन दाबून पुतळ्याचे अनावरण केले. त्याचक्षणी उपस्थित असलेल्या जवळपास दोन लाख अनुयायांनी बाबसाहेबांचा जयघोष करीत अभिवादन केले. या पुतळ्याला ५९ वर्षे झाली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068











टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या