चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्त अभिवादन !
चंद्रपूर :- जिल्हा बार एसोसिएशन तर्फे महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त १४ एप्रिल २०२२ ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्प अर्पण करण्यात आले आणि महामानवास आदरपूर्वक वंदन करण्यात आले. तसेच आज महावीर जयंती निमित्त महावीर स्तंभ, वरोरा नाका,चंद्रपूर येथे जैन तीर्थंकर भगवान महावीर व समस्त जैन संतांना सन्मानपूर्वक पुष्प अर्पण करण्यात आले. चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनचे सचीव ॲड. आशिष धर्मपुरीवार यांनी अशे संबोधित केले कि, डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. तसेच आज महावीर जयंती हा जैन समाजाचा मुख्य सण आहे. भगवान महावीर हे वीर, अतिवीर, सन्मति आणि वर्धमान म्हणूनही ओळखले जाणारे, जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर होते. त्यांनी जैन धर्माचे पुनरुत्थान केले. त्यांनी पूर्व-वैदिक काळातील पूर्वीच्या तीर्थंकरांच्या आध्यात्मिक, दार्शनिक आणि नैतिक शिकवणींचा विस्तार केला. याकरिता आज महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर आणि संपूर्ण जैन संतांना चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन तर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. आजच्या या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अभय पाचपोर, उपाध्यक्ष ॲड. राजेश ठाकूर, सचिव ॲड. आशिष धर्मपुरीवार व असोसिएशनचे सर्व वरिष्ठ अधिवक्ता तथा सहसचिव ॲड.विनायक कार्लेकर, कोषाध्यक्ष ॲड.राजू झुलकंठीवार, ग्रंथपाल ॲड.केनाल सरोजकर कार्यकारिणी सदस्य ॲड. आशिष मुंधडा, ॲड.प्रफुल मुरकुटे, ॲड.उमेश मोहूर्ले, ॲड.कृष्णकांत रासपेल्ली, ॲड.विनोद मोटघरे, ॲड.अविन डोलकर, ॲड.स्नेहा खिरटकर, ॲड.स्नेहा गिरी, ॲड.मंजु लेडांगे, ॲड.राशिद शेख, ॲड.नंदकिशोर राऊत, ॲड.राहुल मेंढे उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068













टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या