धक्कादायक ! चंद्रपूर महानगरपालिकेतील शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलं अटक

Vidyanshnewslive
By -
0

धक्कादायक ! चंद्रपूर महानगरपालिकेतील शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलं अटक

चंद्रपूर :- पैसा ही अशी वस्तू आहे जी चांगल्या चांगल्या माणसाचं मन विचलित करते पैशाच्या हव्यास इतका असतो की माणूस कोणत्याही थराला जातो एक शासकीय नोकरीत काम करणारा कामगार ही लाचेच्या स्वरूपात रक्कम स्वीकारून आपली प्रतिष्ठा व पदाला धुळीस मिळवितो चंद्रपूर शहरातील म्हाडा वसाहतीत घर घेण्यासाठी अर्जदार यांना कुठेही घर नाही असे नाहरकत प्रमाणपत्र देण्याकरिता चंद्रपूर मनपाच्या शून्य कन्सल्टन्सी येथे शिपाई पदावर कार्यरत मनोज मुन यांनी संबंधिताला ५ हजार रु ची लाच मागितली मात्र तडजोड करून मामला १५०० रु ठरला तरीही अर्जदाराला लाच द्यायची नसल्यामुळे त्यांनी यासंबंधीची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केली व सदर विभागाने संबंधित शिपायाला रंगेहात अटक केली. विशेष बाब म्हणजे गरिबांना सवलतीच्या दरात घर उपलब्ध व्हावी यासाठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सबसिडी मिळते यानुसार अर्जदाराला २ लाख ६५ हजार रु ची सबसिडी मिळण्यासाठी घुटकाळा येथील एका नागरिकाने १५ दिवसांपूर्वी मनपात अर्ज केला मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी इतरत्र कुठेही घर नाही असे नाहरकत प्रमाणपत्र द्यावे लागते व ते प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ५ हजार रु ची लाच  मागितली मात्र व्यवहार १५०० रु देण्याचा पक्का झाला व या यानुषणगाने काल ९ एप्रिल २०२२ ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधीत शिपायास सापळा रचून रंगेहात अटक केली असल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे. सदर कारवाई अविनाश भामरे, पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक चंद्रपुर, रमेश दुपारे, रोशन चांदेकर, नरेश ननावरे, वैभव गाडगे, संदेश वाघमारे, मेघा मोहूर्ले, पुष्पा काचोळे व ई नी केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717078

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)