लर्न टू एज्युकेशन फोरम, पुरोगामी साहित्य संसद च्या वतीने कार्यक्रम संपन्न 'श्रमप्रतिष्ठा' पुरस्कार स्वीकारल्या नंतर अनेकांचे मन गहिवरले...!

Vidyanshnewslive
By -
0

लर्न टू एज्युकेशन फोरम, पुरोगामी साहित्य संसद च्या वतीने कार्यक्रम संपन्न

'श्रमप्रतिष्ठा' पुरस्कार स्वीकारल्या नंतर अनेकांचे मन गहिवरले...!

चंद्रपूर :- ऑटो चालक पतीला अचानक लकवा मारला,मी गोंधळली,बावरली रुग्णालयात दाखल करायलाही कुणाची मदत नाही...अखेर पतीला रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयाचा खर्च भागवायचा कसा?धुणीभांडी केली तर जास्तीत जास्त २ हजार मासिक पगार मिळेल.कुठला जॉब बघावा तर तेवढं शिक्षण नाही.रुग्णालयाचा खर्च, घर खर्च कसा भागवावा?हा मोठा प्रश्न उभा ठाकला असतांना पतीने ऑटोची चावी हातात दिली...आणि मी बल्लारपूर शहराची पहिली महिला ऑटो चालक झाली...खुप विरोध झाला, अडचणी जगणं शिकवतात.बळकट करतात...आज मी माझ्या पतीमुळेच स्वावलंबी होऊ शकले...हे उद्गार आहेत बल्लारपूर शहरातील पहिल्या महिला ऑटो चालक सपना पाटील यांचे...लर्न टू एज्युकेश फोरम आणि पुरोगामी साहित्य संसदेच्या संयुक्त विद्यमाने महापुरुषांच्या जयंती निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात 'श्रम प्रतिष्ठा सन्मान' पुरस्काराचे उत्तर देतांना डबडबलेल्या नयनांनी बोलत होत्या.

     लर्न टू एज्युकेशन फोरम आणि पुरोगामी साहित्य संसद च्या संयुक्त विद्यमाने आयोजित सम्राट अशोक, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या जयंतीचे औचित्य साधून स्थानिक लक्ष्मी नारायण मंदिराच्या हॉल मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक ९ एप्रिल रोजी आयोजित या कार्यक्रमाचे उदघाटन दुपारी ३:३० वाजता महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार तथा दीप प्रज्वलित करून करण्यात आले. दुपारी ४ वाजता एड.योगिता रायपुरे यांच्या अध्यक्षतेत तथा संगीत घोडेस्वार यांच्या सूत्रसंचालनात कवी संमेलन संपन्न झाले. या कवी संमेलनात लक्कडकोट, राजुरा, बल्लारपूर, चंद्रपुर, वरोरा इत्यादि ठिकाणचे कवी-कवियत्री यांनी सहभाग नोंदवला. सायंकाळी ५:३० वाजता 'आजच्या पिढीला विज्ञानवादी विचारांची गरज' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. परिसंवादाचे प्रस्थाविक डॉ.क्षमा गवई यांनी केले. प्रमुख उपस्थित निलेश ठाकरे यांची उपस्थिती होती. मार्गदर्शक डॉ.योगेश्वर दुधपचारे यांनी विषयाला सखोल हात घालून मोलाचे मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन ज्योती वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाच्या अखेरीस श्रम प्रतिष्ठा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ज्यात बल्लारपूर येथील सामाजिक कार्यकर्ते भाष्कर भगत, पोष्ट उमेन बुटले ताई चंद्रपूर, सामाजिक कार्यकर्त्या सुशीला तेलमोरे चिनोरा, नागसेन शंभरकर चंद्रपूर, बल्लारपूर शहरातील पहिल्या महिला ऑटोचालक सपना पाटील यांचा शाल,सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. एड.योगिता रायपुरे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी लर्न टू एज्युकेशन फोरम चे सर्व पदाधिकारी,एड.योगिता रायपुरे यांनी परिश्रम घेतले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)